डॉ. सेजल पवार, प्रणित मोरे सायबर पोलिसांच्या रडारवर; उद्या होणार चौकशी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

स्टँडअप कॉमेडी शोदरम्यान करण्यात आलेल्या आक्षेपार्ह वक्तव्यामुळे कॉमेडियन प्रणित मोरे आणि मुंबईतील केईएम रुग्णालयाची प्रशिक्षणार्थी डॉक्टर सेजल पवार चांगलेच अडचणीत आले आहेत. सायबर पोलिसांनी त्यांच्याभोवती कायद्याचा फास आवळला असून दोघांनाही समन्स बजावले असून ते 17 जूनला चौकशीसाठी हजर होणार आहेत.

सायबर पोलिसांनी प्रणित मोरे, सेजल पवार आणि गुरुग्राम येथील प्रेक्षक हिमांशू जांगडा यांना 16 जून रोजी चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश दिले होते. मात्र सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार प्रणित मोरे आणि सेजल पवार हे मंगळवारी तपास अधिकाऱयांसमोर हजर राहणार नाहीत.दोघांनीही पोलिसांना तपासात पूर्ण सहकार्य करण्याची तयारी दर्शवली असून 16 जूनऐवजी 17 जून रोजी आपले जबाब नोंदवण्यास संमती दिली आहे. त्यामुळे आता बुधवारी सायबर पोलीस या दोघांची कसून चौकशी करणार आहेत.