
देशभरात प्रचंड खळबळ उडवणाऱ्या नीट पेपरफुटीचे प्रकरण गाजत असतानाच आता महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षेचा (टीईटी) पेपर फुटला आहे. रविवार 28 जून रोजी ही परीक्षा होणार होती. मात्र एक दिवस आधीच पेपर फुटल्याने ही परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे. यावरून आता शिवसेना नेते, युवासेनाप्रमुख, आमदार आदित्य ठाकरे यांनी सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला आहे. भाजपने संविधान बदलण्यासाठी पक्ष फोडण्यापेक्षा, वारंवार होणारी पेपरफुटी थांबवण्यासाठी लक्ष द्यायला हवे होते, असा टोला आदित्य ठाकरे यांनी एक्सवर पोस्ट करत लगावला.
आदित्य ठाकरे यांनी शनिवारी दुपारी एक्सवर पोस्ट करत टीईटी पेपरफुटीवरून भाजपवर निशाणा साधला. नीटचा पेपर फुटला, मागील काही वर्षांत एमपीएससीचा पेपर फुटतो आणि आता टीईटीचा पेपर फुटला! भाजपने संविधान बदलण्यासाठी पक्ष फोडण्यापेक्षा, वारंवार होणारी पेपरफुटी थांबवण्यासाठी लक्ष द्यायला हवे होते. देशाच्या भवितव्याचे हाल करून ठेवले आहेत भाजपने! असे आदित्य ठाकरे म्हणाले.
गेल्या दशकात महाराष्ट्रात अशा घटना वारंवार घडत असून आपल्या राज्याला बदनाम करून ठेवले आहे. दरवर्षी तरुण-तरुणींनी फक्त आंदोलनंच करायची का? आमच्या देशातील तरुणाईने आपल्या भविष्याची स्वप्न कधी पाहायची? असा सवालही आदित्य ठाकरे यांनी केला आहे.
नीटचा पेपर फुटला, मागील काही वर्षांत एमपीएससीचा पेपर फुटतो आणि आता टीईटीचा पेपर फुटला!
भाजपने संविधान बदलण्यासाठी पक्ष फोडण्यापेक्षा, वारंवार होणारी पेपरफुटी थांबवण्यासाठी लक्ष द्यायला हवे होते. देशाच्या भवितव्याचे हाल करून ठेवले आहेत भाजपने!
गेल्या दशकात महाराष्ट्रात अशा… pic.twitter.com/JhHdWJRtXr
— Aaditya Thackeray (@AUThackeray) June 27, 2026





























































