
शिवसेना विधिमंडळ पक्षनेते आदित्य ठाकरे यांनी विधानसभव परिसरात प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी विधिमंडळात लागू केलेल्या फेस रिकग्नेशन पद्धतीबाबत प्रश्नचिन्ह उभे केले. याचे कंत्राट कोणाकडे दिले, आमदारांची परवानगी न घेता, ही पद्धती कशी लागू केली? आमच्या परवानगीशिवाय आमचे चेहरे कसे वापरले? हा सायबर क्राइमचा प्रकार आहे. याचा गैरवापर झाला तर जबाबदार कोण? असा सवालही त्यांनी केला. तसेच चेंबूरमध्ये झालेल्या दुर्घटनेबाबत खेद व्यक्त करत प्रशासनाचा हलगर्दीपणा याला जबाबदार असल्याचे त्यांनी सांगितले.
या फेस रिकग्नेशन पद्धतीबाबत आपण विधानसभा अध्यक्षांना पत्र लिहिणार आहे, कारण हा सायबर क्राईम आहे. आमदारांची फेशियल रेकग्निशनसाठी कुठेही कन्सेंट न घेता तुम्ही आमच फेसेस म्हणजे आमचे चेहरे वापरले आहेत. पण उद्या जर याचा डीपफेक झाला किंवा कोणाचे बँक अकाउंट किंवा कोणाचा फोन हॅक झाला तर याला जबाबदार कोण? कुठच्या कंपनीकडे व्यवस्थापन आहे? फायर वॉल काय लावले? सिक्युरिटी काय आहे? असे प्रश्न उपस्थित करत त्यांनी आमच्या परवानगीशिवाय ही पद्धती लागू करणे सायबर क्राईम आहे, असे आदित्य ठाकरे म्हणाले.
मुंबईत पहिल्यांदाच पाऊस पडत आहे असे नाही, पण अनेक वर्षांत पहिल्यांदाच बीएमसीमध्ये असे सरकार बसले आहे की, ज्यांना मुंबईची काहीच चिंता नाही. आमचे महापौर बांगलादेशातील ढाका येथे काय चालले आहे यावर अधिक लक्ष केंद्रित करत आहेत. ही दुर्दैवाची गोष्ट आहे. आम्ही त्यांना पूर्वीपासून, आमच्या अनुभवांवरून सांगत आलो आहोत की, रस्त्यांची कामे कशी करायची, ती सुरक्षित पातळीवर कशी आणायची, किंवा कालची घटना कशी टाळता आली, हे कोणीतरी शिकायला हवे. पण त्यांचे संपूर्ण लक्ष राजकारण कसे करायचे आणि ध्रुवीकरण कसे करायचे यावर आहे, असा हल्लाबोल त्यांनी केला.
भाजपची अयोध्या लूट आणि उज्जैनमधील जमिनीची लूट जो कोणी मान्य करेल, त्याने भाजप आणि मिंधे गटात सामील व्हावे, कारण जे हिंदुत्वाच्या विरोधात आहेत ते आज भाजपमध्ये जात आहेत. राम मंदिरात भ्रष्टाचार होऊ शकतो याची तुम्ही कल्पना करू शकला असता का? पण भाजप आणि आरएसएसने नियुक्त केलेल्या लोकांनी भ्रष्टाचार केला आहे. मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री स्वतः तेथील जमिनीची लूट करू शकतील याची तुम्ही कल्पना केली होती का? त्यांनी हे केले आहे, प्रसारमाध्यमांनी हे उघडकीस आणले आहे, त्यामुळे जे हिंदूंच्या विरोधात आहेत तेच भाजपसोबत जाऊ शकतात, असे ते म्हणाले.
चेंबूरमध्ये झाड कोसळून झालेल्या दुर्घटनेत एका मुलाचा मृत्यू झाला आहे. ही घटना दुर्दैवी आहे. याला जबाबदार कोण? संपूर्ण देशामध्ये गेल्या एक दीड वर्षात आपण अनेक बातम्या अशा पाहतो. कुठे मेट्रोचा स्लॅब कोसळतो, बॅरिकेड नसताना कुठच्यातरी खड्ड्यात पडून मृत्यू झालेले आहेत. आता पावसाळ्यात ज्या घटना होत आहेत, झाड पडण्याच्या काल रात्री अजून दोन घटना घडल्या. रस्त्याची काम जी झालेली आहेत आणि गेले चार वर्ष आम्ही जे ओरडत आहोत की, घोटाळेबाजांनी काम केलेली आहेत. कॉन्ट्रॅक्टर बोगस आहेत किंवा मोठ्या नावाखाली भलत्याच लोकांनी काम केलेली आहेत. जर झाडाच्या अवतीभवती तुम्ही पूर्णपणे कॉंक्रिटीकरण केलं, झाडाला मोकळा श्वास घ्यायला जागाच दिली नाही, तर त्याची मुळंही कॉंक्रीटमध्ये आणली, तर दुर्दैवाने ह्या घटना ज्या काल पर्वाकडे घडलेल्या आहेत त्या वाढत जातील, हे आम्ही सातत्याने बोलत आलो आहोत, याची आठवण त्यांनी करून दिली.
याकडे लक्ष देण्याऐवजी मुंबईच्या महापौर बांगलादेशमध्ये काय चाललंय, ढाक्यामध्ये काय चाललंय, याच्यावरच जास्त लक्ष केंद्रीत करत आहेत. त्यांचे मुंबईच्या कामाकडे लक्ष नाही. नुसतं ट्री ट्रिमिंग नाही तर जे कॉंक्रटीकरण झालेल उठसूट सगळीकडे कॉंक्रटीकरण झालेले आहे. झाडाच्या मुळांच्या अवतीभवती जहा कॉक्रटीकरण होतं, तेव्हा ते झाड धोकादायक होतं. हा बेसिक कॉमन सेन्स आत्ताच्या शासनामध्ये नाही. जेव्हा कॉमनसेन्स शासनामध्ये येईल, तेव्हा अशा दुर्घटना थांबतील, असेही ते म्हणाले.
गेले चार वर्ष आम्ही जे कॉंक्रटीकरं घोटाळा त्याच्या विरोधात बोलत आहोत. आता पण जर पाहिलं तर सर्रासपणे सगळीकडे कॉंक्रटीकरण चालू आहे. रस्त्याच कॉंक्रटीकरण एका बाजूला पण जेव्हा तुम्ही फुटपाथ किंवा रस्त्याच्या चवतीभवती जेव्हा झाड असतात आणि त्या मुळांच्या तिथे तुम्ही जेव्हा कॉक्रटीकरण करता तेव्हा ती झाड नाजूक होतात, या बेसिक गोष्टी सरकारने समजून घेण्याची गरज आहे, असे ते म्हणाले.




























































