‘एआरएआय’च्या रिपोर्टमधून माहिती उघड, ई-20 इंधनमुळे वाहनांच्या इंजिनाला नुकसान

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

ई-20 इंधनाच्या रोलआऊटची शिफारस करणाऱ्या ऑटोमेटिव रिसर्च असोसिएशन ऑफ इंडिया (एआरएआय) च्या एका रिपोर्टमध्ये वाहनांना ई-इंधनमुळे नुकसान होत आहे, अशी माहिती समोर आली आहे. वाहनांमध्ये ई-20 चा वापर केल्याने फ्यूल सिस्टममधील रबरने बनलेले वाहनांतील पार्टस् खराब होत आहेत, असे या रिपोर्टमध्ये म्हटले आहे.

हा अभ्यास अद्याप सार्वजनिक करण्यात आला नाही, परंतु ई-20 इंधन धोरणावर सरकार आणि वाहन निर्मात्यासाठी ही महत्त्वपूर्ण माहिती आहे. या नव्या अभ्यासानुसार, चारचाकी वाहनांच्या इंजिन डय़ुरेबिलिटी टेस्टमध्ये एका बीएस-आयव्ही इंजिनचे प्रदर्शन सरासरी दिसले तरी बीएस व्हीआय टर्बोचार्ज्ड इंजिनमध्ये 265 तासांच्या टेस्टिंगनंतर या वाहनामध्ये समस्या आली. एका वाहनाच्या इंजिनमध्ये 809 तासांनंतर चाचणी केल्यानंतर एग्जॉस्ट वॉल्वमध्ये थर्मोमॅकेनिकल फेल झाल्याचे उघड झाले आहे. थर्मोमॅकेनिकल फेल त्याच वेळी होते, ज्या वेळी खूप तापमान आणि लागोपाठ यांत्रिक दबावामध्ये इंजिनचे एग्जॉस्ट वॉल्व बाजूला होते किंवा ते तुटले जाते.