एमपीएससी पूर्वपरीक्षा – लोकाधिकार समिती महासंघाचे प्रशिक्षण वर्ग

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

महाराष्ट्र लोकसेवा आयोगा (एमपीएससी)च्या माध्यमातून होणाऱया विविध पदांच्या भरतीसाठी ‘गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा’ घेतली जाणार आहे. या परीक्षेच्या पूर्वतयारीसाठी स्थानीक लोकाधिकार समिती महासंघातर्फे प्रशिक्षण वर्गांचे आयोजन करण्यात आले आहे.

स्थानीय लोकाधिकार समिती महासंघाचे अध्यक्ष, शिवसेना नेते, खासदार अनिल देसाई, महासंघाचे कार्याध्यक्ष विलास पोतनीस, आमदार सुनील शिंदे, सरचिटणीस प्रदीप मयेकर यांच्या सूचनेनुसार ऑनलाईन व ऑफलाईन पद्धतीने हे वर्ग भरणार आहेत. शासनाने ठरवून दिलेली वयोमर्यादा तसेच अन्य अटी व नियमांमध्ये बसणाऱया इच्छुक परीक्षार्थींनी 17 जुलैपर्यंत https://mpsc.gov.in व https://mpsconline.gov.in या अधिकृत संकेतस्थळावर ऑनलाइन अर्ज भरावेत. तसेच राज्यातील भूमिपुत्रांनी पूर्वपरीक्षेच्या तयारीसाठी अर्ज करावेत, असे आवाहन स्थानीय लोकाधिकार समिती महासंघाच्या वतीने करण्यात आले आहे.

कधी आणि कुठे?

प्रशिक्षण वर्गाबाबत अधिक माहितीसाठी शिवसेना भवन येथील महासंघाच्या कार्यालयात सुट्टीचे दिवस वगळून सायंकाळी 6.30 ते 8.30 या वेळेत चिटणीस शरद एक्के (9892699215), श्रीराम विश्वासराव (9869588469), विलास जाधव (9619118999), सुधाकर नर (8369442951) यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन महासंघाचे चिटणीस व प्रशिक्षण वर्ग प्रमुख उमेश नाईक यांनी केले आहे.