हे करून पहा – रोगप्रतिकारक शक्ती वाढवायचीय?

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

पावसाळा सुरू होताच सर्दी, खोकला आणि संसर्गजन्य आजारांचा धोका वाढतो. अशा वेळी शरीराची रोगप्रतिकारक शक्ती मजबूत ठेवण्यासाठी ‘हे’ सोपे घरगुती उपाय नक्की करून पाहा. रात्री झोपण्यापूर्वी कोमट दुधात अर्धा चमचा हळद टाकून प्या.

तुळशीची पाने, काळी मिरी आणि गूळ घालून बनवलेला काढा प्या. पावसाळी आजारांवर हा एक उत्तम आणि झटपट उपाय आहे. रोज सकाळी उपाशीपोटी तुळशीची पाने खाल्ल्याने किंवा तुळशीचा चहा प्यायल्याने व्हायरल इन्फेक्शनचा धोका टळतो.