
शांतता करारावर सह्या केल्यानंतरही आखातात शांतता प्रस्थापित झालेली नसून इराण अमेरिका यांच्यात क्षेपणास्त्र हल्ले सुरूच असल्याचे पाहायला मिळत होते. मात्र गुरुवारी अमेरिकेच्या लष्कराने गुरुवारी जाहीर केले की, त्यांनी इराणला लक्ष्य करून पुन्हा एकदा सुरू केलेले हवाई हल्ले सुमारे ९० लक्ष्यांवर मारा केल्यानंतर थांबवली आहे.
अमेरिकन लष्कराच्या सेंट्रल कमांडने हे निवेदन जारी केले आहे. त्यांनी एका विमानतळाची धावपट्टी आणि क्षेपणास्त्र लाँचर्सना लक्ष्य करून केलेल्या हल्ल्यांचे ब्लॅक-अँड-व्हाईट फुटेज देखील प्रसिद्ध केल्याचे पीटीआयच्या वृत्तात म्हटले आहे.
मात्र या टप्प्यातील हल्ले थांबवले असले तरी’अमेरिकन सुरक्षा दले अत्यंत सतर्क, प्राणघातक आणि कमांडर-इन-चीफ यांच्या निर्देशानुसार मोहिमा राबवण्यासाठी सज्ज आहेत’, असेही त्यांनी पुढे सांगितले.





























































