
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या मोशी येथील कचरा डेपोत कचऱयाचा डोंगर तीन मजली इमारतीवर कोसळून बुधवारी झालेल्या दुर्घटनेतील एका कामगाराचा मृतदेह हाती लागला आहे. 24 तासांहून अधिक काळ बचावकार्य सुरूच असून, नऊजणांची सुखरूप सुटका करण्यात यश आले. मात्र आठ कामगार अजून इमारतीच्या ढिगाऱ्याखाली गाडले गेले असून, त्यांना बाहेर काढण्याचे प्रयत्न बचाव पथकाकडून सुरू आहेत. भाकेश मोहन काणी असे या दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्या कामगाराचे नाक आहे. मोशी येथील कचरा डेपोतील कचऱ्याचा सात मजली डोंगर बुधवारी ‘वेस्ट टू एनर्जी’ प्रकल्पाच्या इमारतीवर कोसळला. इमारतीतील दुसऱ्या मजल्यावर दुपारच्या जेकणासाठी 23 कामगार एकत्र आले होते. त्यामध्ये एका महिलेचाही समाकेश होता. हे सर्कजण इमारतीखाली अडकले होते.



























































