ट्रेंड – मरीन ड्राइव्हवर अवतरला ‘क्रिश’

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

हृतिक रोशनच्या ‘क्रिश’ या चित्रपटातील सुपरहीरोसारखा वेश केलेल्या एका तरुणाचा व्हिडीओ सध्या तुफान व्हायरल होत आहे. नीरज माझी या सोशल मीडिया स्टारने neerajmajhiofficial या इन्स्टा अकाउंटवर शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये त्याने ‘क्रिश’सारखी वेशभूषा केली होती. मरीन ड्राइव्हवर अतिशय वेगात धावत उडय़ा मारत नीरजने अनेकांचे लक्ष वेधले. त्याचे स्टंट इतके अचूक होते की ते बघून हृतिकनेही त्याला मागे वळून पाहिले असते. नेटिझन्सनी गमतीने म्हटले की जेव्हा मरीन ड्राइव्हवर गस्त घालणारा स्वतःचा ‘क्रिश’ आहे, तर मुंबईला ‘बॅटमॅन’ची किंवा ‘एव्हेंजर्स’ची गरज नाही. आणखी एकाने विचारले, ‘हृतिक हा तूच आहेस का?’ हा व्हिडीओ 45 हजार 934 जणांनी पाहिला आहे.