
>> ब्रिगेडियर हेमंत महाजन
भारताच्या अंतराळ क्षेत्रात अलीकडे दोन महत्त्वाच्या घटना घडल्या. पहिली म्हणजे स्कायरूट एरोस्पेस या भारतीय खासगी स्टार्टअपने विकसित केलेल्या ‘विक्रम-1’ रॉकेटचे यशस्वी प्रक्षेपण, तर दुसरी म्हणजे इस्रोमधील सुमारे 120 वैज्ञानिक संस्थेतून बाहेर पडल्याची चर्चा. या दोन्ही घटनांनी भारतीय अंतराळ क्षेत्राच्या वर्तमान स्थितीबरोबरच भविष्यातील दिशा, संधी आणि आव्हाने यांबाबत व्यापक चर्चा सुरू केली आहे.
भारतीय अंतराळ संशोधन संस्था म्हणजे ‘इस्रो’मध्ये झालेल्या अनेक राजीनाम्यांच्या घडामोडी भारतासाठी ‘ब्रेन ड्रेन’ आहेत का, भारतीय खासगी उद्योगांसाठी ‘ब्रेन गेन’ आहेत का, की काही प्रमाणात परकीय शक्तींसाठीही लाभदायक ठरत आहेत, हा विचार करण्याचा विषय आहे.
भारत सरकारने याला उत्तर म्हणून प्रकल्प पूर्ण होईपर्यंत महत्त्वाच्या प्रकल्पांवर काम करणाऱया शास्त्रज्ञांना सहज राजीनामा देता येणार नाही, असे नवीन नियम तयार केले आहेत, पण फक्त राजीनाम्यावर निर्बंध घालणे हा प्रश्नाचा पूर्ण उपाय नाही. त्यामागे वेतन रचना, कामाचे वातावरण, सुरक्षा आणि संपूर्ण संरक्षण अवकाश औद्योगिक ढाच्याचा मोठा प्रश्न दडलेला आहे.
माध्यमांमध्ये आलेल्या माहितीनुसार, मागच्या वर्षांत इस्रोमधील किमान 100-120 शास्त्रज्ञ आणि अभियंत्यांनी राजीनामे किंवा स्वयंसेवानिवृत्ती दिली आहे. यामध्ये गगनयान (मानव अंतराळ मोहीम), उपग्रह प्रक्षेपण व इतर महत्त्वपूर्ण प्रकल्पांवर काम करणाऱया कर्मचाऱयांचा समावेश आहे. शास्त्रज्ञ इस्रो का सोडत आहेत, यामागे बाहेरचे आकर्षण आणि इस्रोतील असमाधान अशा दोन बाजू दिसतात.
बाह्य आकर्षण
भारताने 2020 पासून अवकाश क्षेत्र खासगी उद्योगांसाठी उघडले आणि 2023 मध्ये नवीन घ्ह्ग्aह एज्aम झ्दत्ग्म्ब् जाहीर केली. त्यामुळे लघु रॉकेट, छोटे उपग्रह, अवकाश डेटा विश्लेषण, कमर्शियल लाँच सर्व्हिसेस असे अनेक स्टार्टअप्स आणि पंपन्या उभ्या राहिल्या. या कंपन्यांना अनुभवी इस्रो शास्त्रज्ञांची फार मोठी गरज आहे – डिझाईन, सिस्टीम इंजिनीअरिंग, दर्जा नियंत्रण आणि नियामक प्रक्रियांमध्ये त्यांचा अनुभव अमूल्य आहे.
खासगी क्षेत्रात या शास्त्रज्ञांसाठी सरकारी पगाराच्या तुलनेत खूप जास्त वेतन,शेअरऑप्शन्स,जलद पदोन्नती,कमी नोकरशाही आणि अधिक स्वातंत्र्यपूर्ण कामाचे वातावरण अशा गोष्टी उपलब्ध आहेत. त्यामुळे 15-25 वर्षांचा अनुभव असलेल्या मध्यम कारकीर्द शास्त्रज्ञांसाठी बाहेर जाणे आर्थिक आणि व्यावसायिकदृष्टय़ा आकर्षक ठरते.
आंतरिक असमाधान
इस्रोच्या आत पुढील गोष्टींमुळे असमाधान वाढत आहे –
- वेतनातील विसंगती – जागतिक व भारतीय खासगी बाजारातील तुलनात्मक काwशल्य आणि जबाबदारीच्या मानाने सरकारी वेतन खूप कमी आहे.
- करीअरमध्ये ठप्पपणा – पदोन्नती उशिरा होणे, मर्यादित lateral movement, फाईल आधारित निर्णय प्रक्रिया आणि प्रकल्पांतील विलंब यामुळे निराशा वाढते.
- कामाचा अति ताण – अनुभवी कॅडरची संख्या कमी होत असताना मिशनची संख्या आणि महत्त्व वाढत असल्याने कामाचा ताण प्रचंड वाढतो.
हा प्रश्न भारताच्या सरकारी आर अॅण्ड डी मॉडेलवरच गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित करणारा आहे.
खरा प्रश्न आहे तो हा की, (1) हे शास्त्रज्ञ कुठे जात आहेत? (2) ते जाण्यानंतर काय करत आहेत?
अनेक इस्रो माजी शास्त्रज्ञ देशातीलच खाजगी अवकाश तंत्रज्ञान आणि संरक्षण संबंधित कंपन्यांमध्ये उच्च पदांवर जात आहेत. ते CTO, चीफ डिझायनर, सल्लागार किंवा संस्थापक म्हणून काम करत आहेत, ज्यामुळे भारताची संपूर्ण अवकाशऔद्योगिक क्षमता वाढत आहे.
जर बहुतेक वैज्ञानिक भारतातच राहून भारतातील कंपन्यांत काम करत असतील तर ते पूर्णपणे ‘ब्रेन ड्रेन’ न म्हणता ‘ब्रेन सर्क्युलेशन’ म्हणणे जास्त योग्य ठरेल, परंतु दोन अटी महत्त्वाच्या आहेत. इस्रो / डीआरडीओच्या मूलभूत क्षमता उद्ध्वस्त होणार नाहीत.
परकीय शक्तींना लाभ
काही भारतीय शास्त्रज्ञ परदेशातील अवकाश संस्था, विद्यापीठे किंवा मोठय़ा एरोस्पेस पंपन्यांमध्ये गेल्याची उदाहरणे आहेत, परंतु अलीकडच्या काळात मोठ्या संख्येने प्रमुख इस्रो वैज्ञानिक भारतविरोधी देशांच्या कार्यक्रमात थेट सहभागी झाले, अशी ठोस सार्वजनिक माहिती उपलब्ध नाही.
तरीही धोका पूर्णपणे नाहीसा होत नाही. म्हणूनच सेवाअंत झाल्यानंतर पुठे आणि कशा प्रकारच्या नोकऱया घेता येतील यावर काही कायदेशीर मर्यादा असणे आवश्यक आहे. विशेषतः शत्रू राष्ट्रांशी संबंधित संस्थांबाबत.
भारत महासत्ता व्हायचा असेल तर केवळ इस्रो, डीआरडीओ पुरेसे नाहीत. संपूर्ण रक्षा अवकाश औद्योगिक साखळी सक्षम असणे गरजेचे आहे.
जर भारताला खऱया अर्थाने तांत्रिक आणि वैज्ञानिक महासत्ता व्हायचे असेल तर तीन गोष्टींवर भर द्यावा लागेल –
- सार्वभौम ‘कोअर’ क्षमता मजबूत ठेवणे ः इस्रो, DRDO, BARC यांच्यातील सर्वोच्च प्रतिभा टिकवून ठेवून आण्विक सुरक्षा, क्षेपणास्त्र, अवजड लॉन्च, अंतराळ आधारित ISR, missile defence यांसारख्या क्षेत्रांत राज्य नेतृत्व कायम ठेवणे.
- इस्रोने आता एका ‘मदर छत्रछायेची संस्था’ (Umbrella Organization) म्हणून काम केले पाहिजे आणि खासगी स्पर्धेला सामोरे जाण्यासाठी आपले वर्प कल्चर अधिक प्रोफेशनल बनवले पाहिजे.
- ब्रेन सर्क्युलेशनचा स्वीकार ः प्रतिभेची काही प्रमाणातील हालचाल खुल्या व विकसित अर्थतंत्रात अपरिहार्य आहे. प्रश्न एवढाच की ही हालचाल भारताच्या हितात राहील का? त्यासाठी कायदे, sabbatical व्यवस्था, alumni नेटवर्प आणि भागीदारी मॉडेलची गरज आहे.
प्रत्येक धक्क्यातून शिकण्याची संस्थात्मक क्षमता – प्रत्येक प्रक्षेपण अपयश, प्रत्येक गुप्तचर हल्ला हा संस्थात्मक पातळीवर ते onslearned होऊन पुढील धोरण आणि प्रक्रिया सुधारण्याचे साधन बनायला हवा.
भारताचा वैज्ञानिक समुदाय हा देशाच्या सॉफ्ट आणि हार्ड पॉवरचा प्रमुख आधार आहे. या मनुष्यबळाचे नियोजन, संरक्षण आणि योग्य वापर हा आजच्या काळातील तितकाच महत्त्वाचा राष्ट्रीय सुरक्षा प्रश्न आहे, जितका पारंपरिक सैन्यशक्तीचा आहे.




























































