
नीट पेपरफुटी प्रकरणात केंद्र सरकारने आज मोठी कारवाई करत नॅशनल टेस्टिंग एजंसीने (एनटीए) 47 अधिकाऱयांना तत्काळ सेवेतून बडतर्फ केले. या अधिकाऱ्यांविरोधात फौजदारी कारवाईदेखील होणार आहे.
दिल्लीत गेल्या काही दिवसांपासून कॉक्रोच जनता पार्टीच्या आंदोलनामुळे देशातील वातावरण तापले आहे. शिक्षण व्यवस्थेत व्यापक सुधारणांची मागणीही करण्यात येत आहे. विद्यार्थ्यांच्या आंदोलनानंतर जागे झालेल्या मोदी सरकारने ‘एनटीए’मध्ये व्यापक बदल करण्याचा निर्णय घेतला असून त्यानुसार 47 अधिकाऱयांवर बडतर्फीची कारवाई करण्यात आली. यापूर्वी गुरुवारी सरकारने शिक्षण मंत्रालयातील दोन सचिवांची उचलबांगडी केली होती. अधिकाऱयांनी दिलेल्या माहितीनुसार, परीक्षा प्रक्रियेतील आऊटसार्ंसग व्यवस्थेतही बदल करण्यात येणार असून संस्थेत तांत्रिक सुधारणा करून पेपरफुटी रोखण्यासाठी भक्कम यंत्रणा उभारण्यात येणार आहे.

























































