
समर्थ संप्रदायाने महानुभाव पंथाप्रमाणे परमार्थ क्षेत्रात स्त्रियांना अनन्यसाधारण महत्त्व दिले आहे. स्त्रियांमधील आत्मसन्मान जागृत करणे, हे समर्थ संप्रदायाचे प्रमुख कार्य होते. स्त्रियांच्या नकारात्मकतेवर परमार्थ योग्य उपाय म्हणून स्त्रियांना सगळे अधिकार समर्थांनी दिले होते. अशाच एक समर्थांनी नेमलेल्या मठपती म्हणजे संत अंबिकाबाई. त्या मूळच्या विजापूरच्या, त्यांनी कोल्हापुरात मठ स्थापन करून तिथेच राहिल्या. जुन्या ग्रंथात त्यांच्या काही पदांचा, श्लोकांचा उल्लेख आहे. मी सद्गुरूची। सौरी शोभत्ये बरी। बाई मज गोल्हाटी गे रहाणे। समर्थांचा वेळोवेळी दृष्टांत रूपात सहवास त्यांना लाभला. समर्थांमुळे एक वेगळे धैर्य त्यांच्यात आले होते. दत्तात्रेय स्वामींचे ऊर्फ भीमस्वामी यांनी आपल्या भक्तिलीलामृत ग्रंथात उल्लेख केला आहे. आपल्या मठपती काळात उत्तम कीर्तन-प्रवचन करून अंबाबाईंनी मठात अनेक योजना राबवल्या. निराधार आधार झाल्या आणि आध्यात्मिक दृष्टिकोनातून मठाला वेगळी fिदशा त्यांनी दिली.



























































