17 दिवसांतच नव्या पुलाला भगदाड

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

भाजपशासित राज्यांमध्ये भ्रष्टाचाराचे आणखी एक उदाहरण समोर आले आहे. 16 कोटी रुपये खर्च करून नदीवर बांधलेल्या पुलाचा मोठा भाग उद्घाटनानंतर अवघ्या 17 दिवसांमध्ये वाहून गेला. उत्तराखंडची राजधानी देहराडून येथील ही घटना आहे. टोन्स नदीवर हा पूल बांधण्यात आला होता. मुसळधार पावसात पुलाचा मोठा भाग अचानक वाहून गेला आणि पुलावर विहिरीसारखा मोठा खड्डा पडला. त्यामुळे या पुलाच्या बांधकामाच्या दर्जावर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले आहे. प्रेमनगर ते देहराडून मार्गावर हा पूल बांधण्यात आला असून 12 जुलै रोजी तो वाहतुकीसाठी खुला करण्यात आला होता.