त्यांच्या मनात अपराधीपणाची भावना आहे म्हणून ते…, राहुल गांधी यांची अमित शहांवर टीका

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

पावसाळी अधिवेशनात बुधवारी विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी आपल्या पहिल्याच भाषणाने संसद अक्षरशः दणाणून सोडली. परफुटी विरोधात आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर गोळीबार करण्याची परवानगी अमित शहांनीच दिली. पेलेट गनच्या मदतीने मुलांना लक्ष्य केले. शहांनीच हे गोळीबाराचे आदेश दिले,’ असा दावा राहुल यांनी केला. त्यानंतर लोकसभेत मोठा गदारोळ झाला.

दरम्यान गुरुवारी राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा ट्विटरवरून अमित शहा यांच्या संसदेतील अनुपस्थितीवर प्रश्न विचारला. ”अमित शाह संसदेत येऊन विद्यार्थ्यांवरील अमानुष हिंसाचाराबद्दल स्पष्टीकरण द्यायला इतके का घाबरत आहेत? त्यांच्या मनात अपराधीपणाची भावना आहे का?’, असे राहुल गांधी यांनी ट्विट केले आहे.

विद्यार्थ्यांचा खरा शत्रू आरएसएस

‘देशातील व्यवस्थेवर आरएसएसने कब्जा केला आहे. प्रधान यांचा राजीनामा हा दिखावा आहे. शिक्षण खाते ते चालवतच नव्हते. आरएसएस हे खाते चालवते, असे राहुल म्हणाले. विद्यार्थ्यांचा राग नेमका कशावर आहे हे समजून घेतले पाहिजे. त्यांना विद्यार्थी म्हणून जगूच दिले जात नाही. आवडीनुसार शिकू दिले जात नाही. खुलेपणाने बोलू दिले जात नाही, प्रश्न विचारू दिले जात नाहीत. त्यांच्यावर आरएसएसला हवा असलेला इतिहास लादला जात आहे, असा आरोप राहुल गांधी यांनी गुरुवारी केला.