
संसदेने बुधवारी ‘वंदे मातरम’ या राष्ट्रगीताचा अवमान करणे हा गुन्हा ठरवणारे विधेयक मंजूर केले. राज्यसभेत मंजूर झाल्यानंतर हे विधेयक लोकसभेत गुरुवारी मंजूर झाले. ‘राष्ट्रीय सन्मानाचा अपमान प्रतिबंध (दुरुस्ती) विधेयक 2026’ हे विधेयक एक दिवस आधीच राज्यसभेने मंजूर केले होते. लोकसभेत मंजूर झाल्यामुळे, ही प्रस्तावित सुधारणा आता कायदा बनण्याच्या अधिक जवळ आली आहे.
लोकसभेत सुरु असलेल्या गदारोळात आवाजी मतदानाने ‘राष्ट्रीय सन्मानाचा अपमान प्रतिबंध (दुरुस्ती) विधेयक 2026’ करण्यात आले. या विधेयकामुळे ‘वंदे मातरम्’ या राष्ट्रीय गीताचा समावेश संबंधित कायद्याच्या कक्षेत करण्यात आला असून, आता राष्ट्रीय गीताचा अवमान करणाऱयाविरुद्ध फौजदारी गुन्हा दाखल होणार आहे.



























































