लोककला आणि लोककलावंतांचे सर्वेक्षण होणार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

राज्यातील सर्व लोककला प्रकार आणि लोककलावंतांचे सर्वेक्षण होणार आहे. या सर्वेक्षणामुळे राज्यातील लोककला प्रकारांची अधिकृत माहिती उपलब्ध होईल; तसेच लोककलावंतांना शासनाच्या विविध योजना, मानधन, अनुदान व कल्याणकारी सुविधांचा लाभ मिळू शकणार आहे.

लोककलावंतांच्या विविध प्रश्नांवर लोककला अकादमीचे विभागप्रमुख प्रा. डॉ. गणेश चंदनशिवे, ज्येष्ठ पत्रकार व लोककलेचे अभ्यासक खंडूराज गायकवाड आणि लोककलेचे अभ्यासक डॉ. शिवाजी वाघमारे यांनी सांस्कृतिक कार्य मंत्री आशिष शेलार यांच्यासोबत चर्चा केली. राज्यातील सर्व लोककला प्रकार आणि लोककलावंतांचे सर्वेक्षण करून त्यांना शासनमान्य अधिकृत ओळखपत्र देण्यात यावे, तसेच लोककला प्रकारांची प्रमाणित माहिती शासनाच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी त्यांनी केली. यावर लवकरच संबंधित अधिकाऱ्यांसोबत बैठक घेऊन निर्णय घेतला जाईल, असे आश्वासन शेलार यांनी दिले.