इंडिगोकडून 20 हजार प्रवाशांना मोफत प्रवास, कंपनीला 20 वर्षे पूर्ण झाल्याने खास ऑफर

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

इंडिगो कंपनीला 20 वर्षं पूर्ण झाल्यानिमित्ताने कंपनीने 20व्या वर्धापन दिनानिमित्त प्रवाशांसाठी आकर्षक ऑफर जाहीर केली आहे. या ऑफर अंतर्गत देशातील 20 हजार प्रवाशांना फ्री प्रवास करण्याची संधी मिळणार आहे. कंपनीच्या हॅप्पी इंडिगो डे मोहिमेंतर्गत पात्र प्रवाशांना 10 हजार रुपयांपर्यंतचे भाडे रिफंड केले जाणार आहे.

ही ऑफर 4 ते 6 ऑगस्ट या कालावधीत देशांतर्गत फ्लाईट बुकिंगसाठी लागू आहे. ही सवलत फक्त इंडिगोच्या अधिकृत माध्यमांद्वारे केलेल्या बुकिंगवरच मिळणार आहे. यामध्ये इंडिगोची अधिकृत वेबसाईट, मोबाईल अॅप, एआय व्हर्च्युअल असिस्टेंट 6ईएसकेएआयचा समावेश आहे. ऑफर कालावधीत पात्र प्रवाशांची निवड रँडम सिलेक्शन प्रक्रियेद्वारे केली जाईल. पात्र प्रवाशांना कंपनीकडून ई-मेल आणि व्हॉट्सअॅप मेसेज पाठवला जाईल. यात एक सोपा प्रश्न विचारला जाईल. योग्य उत्तर देण्यासाठी तीन संधी दिल्या जातील. योग्य उत्तर दिल्यास प्रवाशाला बुकिंगचे भाडे कमाल 10 हजारांपर्यंत परत केले जाईल.