डाबर उत्पादनाची स्थगिती दिल्ली कोर्टाने उठवली

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरणाने डाबर कंपनीची 100 टक्के शुद्ध, 100 टक्के नैसर्गिक आणि 100 टक्के ऑर्गेनिक असे दावे असलेली उत्पादने विकण्यास मनाई केली होती, परंतु दिल्ली उच्च न्यायालयाने डाबरला मोठा दिलासा देत एफएसएसएआयच्या आदेशाला स्थगिती दिली आहे. कोर्टाच्या या अंतरिम निर्णयामुळे सध्या डाबरला संबंधित उत्पादने बाजारात पुन्हा विकता येईल. मागील आठवडय़ात एफएसएसएआयने डाबर इंडियाला आदेश देत 100 टक्के दाव्यांसह विक्री होणारी खाद्य उत्पादने हटविण्यास सांगितले होते.