साई सुदर्शन संघाबाहेर 

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

श्रीलंकेविरुद्धची कसोटी मालिका सुरू होण्यापूर्वीच टीम इंडियाला मोठा धक्का बसला आहे. कारण जसप्रीत बुमरानंतर आता डावखुरा फलंदाज साई सुदर्शन दुखापतग्रस्त झाला आहे. त्यामुळे तो श्रीलंकेविरुद्धच्या मालिकेतमधून संघाबाहेर झाला आहे. सुदर्शनची देशांतर्गत आणि लाल चेंडूच्या क्रिकेटमधील गेल्या काही महिन्यांत प्रभावी कामगिरी झाली होती. त्यामुळे हे भारतीय फलंदाजीसाठी एक मोठे नुकसान समजले जात आहे.

साई सुदर्शनच्या जागी कोण?

साई सुदर्शन मालिकेतून बाहेर पडल्याने हिंदुस्थानी संघात तिसऱ्या क्रमांकाच्या जागेसाठीचे समीकरण बदलले आहे. सराव सामन्यात श्रीलंका क्रिकेट इलेव्हनविरुद्ध 103 धावांचे शानदार शतक झळकवणारा देवदत्त पडिक्कल आता तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करण्यासाठी प्रबळ दावेदार बनला आहे. सुदर्शनच्या अनुपस्थितीमुळे पडिक्कलला कसोटी मालिकेत स्वतःला सिद्ध करण्याची सुवर्णसंधी मिळेल.