एनडी स्टुडिओमध्ये शूटिंग करण्यास 50 टक्के सवलत

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कर्जतच्या खालापूर येथील एन.डी. स्टुडिओमध्ये शूटिंग व अन्य बाबींसाठी 50 टक्के सवलतीची घोषणा आज राज्य शासनाने केली. राज्य शासनाने ताब्यात घेतलेल्या एन.डी. स्टुडिओच्या अध्यक्षपदाचा पदभार सांस्पृतिक कार्यमंत्री आशीष शेलार यांनी आज स्वीकारला. त्यानंतर स्टुडिओच्या संचालक मंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.

या बैठकीत चित्रपट निर्मितीला अधिक चालना देणे, निर्मात्यांसाठी चित्रीकरणाचा खर्च कमी करणे आणि एन.डी. स्टुडिओचा प्रभावीपणे विकास करणे यादृष्टीने बैठकीत महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले.

निर्माते, दिग्दर्शक, कलाकार आणि तंत्रज्ञांना अधिक अनुपूल वातावरण उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने 31 मार्च 2027 पर्यंत चित्रीकरण व अन्य गोष्टींमध्ये 50 टक्के सवलत दिली जाणार आहे.

यावर सवलत लागू

  •  एन.डी. स्टुडिओतील थीम पार्कचे प्रवेश शुल्क
  • चित्रीकरणासाठी येणारे निर्माते, कलाकार, कलादिग्दर्शक व इतर मान्यवरांसाठी उपलब्ध निवास व्यवस्था
  • चित्रीकरणासाठी उपलब्ध करून देण्यात येणाऱ्या विविध स्थळांचे शुल्क

सांस्पृतिक पर्यटनालाही प्रोत्साहन

महाराष्ट्रातील एक महत्त्वाचे आणि सर्वसमावेशक चित्रपट निर्मिती केंद्र म्हणून विकसित करण्याच्या दृष्टीने पुढील काळात विविध उपक्रम राबविण्याचे संकेतही या बैठकीत देण्यात आले.