
झारखंडमध्ये विद्यार्थी आणि राज्य सरकार यांच्यात सहमती झाल्यानंतर विद्यार्थ्यांनी आपलं उपोषण मागे घेतलं आहे. यावर लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी आनंद व्यक्त केला. ते म्हणजे म्हणाले आहेत की, “संपूर्ण देशात सिस्टीम बदलणार. आता अशी सिस्टीम तयार केली जाईल जी विद्यार्थ्यांना मागे न खेचता पुढे घेऊन जाईल.” X वर एक पोस्ट करत ते असं म्हणाले आहेत.
राहुल गांधी काय म्हणाले?
राहुल गांधी यांनी X वर पोस्ट करत म्हटले आहे की, “मुख्यमंत्री हेमंत सोरेन आणि झारखंड सरकारने संवादाचा मार्ग निवडला आणि तोडगा काढला. विद्यार्थ्यांनीही संयम बाळगून आपले म्हणणे मांडले. जेव्हा विद्यार्थी प्रश्न उपस्थित करतात, तेव्हा त्यांना उत्तर मिळायलाच हवे, हाच योग्य मार्ग आहे.”
ते पुढे म्हणाले, “आम्ही देशातील प्रत्येक विद्यार्थ्यासोबत उभे आहोत. प्रत्येक विद्यार्थ्याला त्याच्या मेहनतीचे फळ मिळावे आणि निष्पक्ष स्पर्धेचा अधिकार मिळावा म्हणून आम्ही ही रिकव्हरी सिस्टीम पूर्णपणे बदलून टाकू. ही सिस्टीम संपूर्ण देशात बदलली जाईल. आता एक अशी सिस्टीम तयार केली जाईल, जी विद्यार्थ्यांना पुढे नेईल, त्यांना मागे खेचणार नाही.”

























































