
शेतीत वापरल्या जाणाऱया कीटकनाशकांबाबत जनजागृती करणे म्हणजे बदनामी नव्हे, असा निर्वाळा देत उच्च न्यायालयाने दोन डॉक्टरांविरोधातील बदनामीचा गुन्हा व खटला रद्द केला. टीव्हीवरील एका कार्यक्रमात या डॉक्टरांनी कीटकनाशकांसदर्भात आपले मत व्यक्त केले होते. याची तक्रार पोलिसांत करण्यात आली. त्यानुसार बदनामीचा गुन्हा नोंदवत महानगर दंडाधिकारी यांच्यासमोर याचा खटला सुरू होता. हा रद्द करण्यासाठी या दोन डॉक्टरांनी याचिका दाखल केली होती.



























































