
कॅनडातील सरे शहरातील एका उद्यानात तरुणीचा विनयभंग केल्याप्रकरणी हिंदुस्थानी वंशाच्या 40 वर्षीय व्यक्तीला अटक करण्यात आली आहे. जगेंदर कुराणा असे अटक आरोपीचे नाव आहे. सरे शहरातील बेअर क्रीक पार्कमध्ये ही घटना घडली. आरोपीने आपला विनयभंग करत तिथून पळ काढला, अशी तक्रार पीडितेने पोलिसांकडे केली होती. यानंतर कुराणा याच्यावर लैंगिक अत्याचार आणि लैंगिक गैरवर्तन केल्याचे दोन आरोप ठेवण्यात आले आहेत.
एनडीटीव्हीने दिलेल्या वृत्तानुसार, घटनेनंतर आरोपी पळून गेला. पोलिसांनी उद्यान आणि आसपासच्या परिसरात आरोपीचा कसून शोध घेतला. मात्र आरोपी सापडला नाही. पीडितेने दिलेल्या वर्णनानुसार, पोलिसांनी जनतेला आवाहन करत संशयिताचे फोटो जारी केले. यानंतर सदर वर्णनाशी जुळणाऱ्या एका व्यक्तीची ओळख पटली. त्यानुसार कुराणा याला अटक करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले. सध्या कुराणा याला कोठडीत ठेवण्यात आले आहे.



























































