साप्ताहिक राशिभविष्य – रविवार 23 ऑगस्ट 2026 ते शनिवार 29 ऑगस्ट 2026

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
>> नीलिमा प्रधान
मेष – वरिष्ठांची मर्जी राखा
सूर्य, बुध युती, प्रकृतीची काळजी घेऊन सर्व कामे करा. भावनेच्या आहारी न जाता कोणताही निर्णय घ्या. नोकरीत वरिष्ठांची मर्जी राखा. गैरसमज दूर करण्याचा प्रयत्न करा. राजकीय, सामाजिक क्षेत्रात सहकारी वर्गाला कमी लेखू नका. शुभ दि. 23, 24
वृषभ – प्रगतीची संधी मिळेल
चंद्र, शुक्र त्रिकोणयोग. रेंगाळलेल्या कामांना गतिमान करता येईल. प्रगतीची नवी संधी मिळेल. प्रतिष्ठा, लोकप्रियता लाभेल. नोकरीधंद्यात वाढ होईल. राजकीय, सामाजिक क्षेत्रात योजना पूर्ण करा. सहकार्य मिळेल. जुना वाद संपवा.  शुभ दि. 25, 26
मिथुन – रागाला आवर घाला
चंद्र, गुरू प्रतियुती. क्षुल्लक तणाव वाढवू नका. रागाला आवर घाला. मोठे यश संपादन कराल. जुना वाद संपवा. नोकरीधंद्यात प्रगती होईल. वाहनाचा वेग नियंत्रणात ठेवा. राजकीय, सामाजिक क्षेत्रात वर्चस्व वाढेल. लौकिकात भर पडेल. शुभ दि. 23, 24
कर्क – अडचणींवर मात कराल
सूर्य, बुध युती. संताप वाढवणाऱया घटना घडतील. दुखापत टाळा. अडचणींवर मात कराल. यश संपादन करा. नोकरीत अरेरावी त्रासदायक ठरेल. धंद्यात धावपळ होईल. राजकीय, सामाजिक क्षेत्रात गुप्त कारवायांवर नजर ठेवा. शुभ दि. 25, 26
सिंह – कायदा मोडू नका
सूर्य, बुध युती. योग्य व्यक्तीचा सल्ला घेऊन तुमच्या क्षेत्रात काम करा. कायदा मोडेल असे कृत्य नको. नम्रता बाळगा. तुमचे महत्त्व वाढेल. नोकरीधंद्यात बदल घडतील. राजकीय, सामाजिक क्षेत्रात तडजोडीची भूमिका घ्या. शुभ दि. 16, 17
कन्या – प्रसंगावधान राखा
चंद्र, गुरू प्रतियुती. ठरवलेल्या कामात क्षुल्लक अडचणी येतील. नम्रता ठेवा. कायद्याच्या विरोधात  बोलू नका. नोकरीधंदा टिकवा. अहंकारयुक्त भाष्य करू नका. राजकीय, सामाजिक क्षेत्रात तटस्थ रहा. थट्टामस्करीत प्रसंगावधान ठेवा. शुभ दि. 25, 26
तूळ – प्रयत्नांना महत्त्व द्या
सूर्य, बुध युति, विरोध, टीका सहन करून यशाचा मार्ग शोधा. प्रयत्नांना महत्त्व द्या. यश, प्रतिष्ठा मिळवा. नोकरीत टिका होईल. वरिष्ठांना खूष कराल. स्पर्धा करणारे वाढतील. राजकीय, सामाजिक क्षेत्रात योजना गतिमान करा. प्रतिमा उजळेल.  शुभ दि. 23, 24
वृश्चिक – प्रत्येक दिवस यश देणारा
चंद्र, गुरू प्रतियुती. वादग्रस्त विधान करू नका. प्रत्येक दिवस यश देणारा. कायदा सर्वत्र पाळा. नोकरीधंद्यात प्रगती होईल. नवा परिचय फायदेशीर ठरेल. राजकीय, सामाजिक क्षेत्रात तुमच्या कार्याचे स्वागत होईल. मैत्री वाढेल. प्रतिष्ठा वाढेल. शुभ दि. 24, 26
धनु – चौफेर सावध रहा
चंद्र, शुक्र त्रिकोणयोग. प्रत्येक दिवस कार्य पूर्ण करण्यास उपयुक्त ठरेल. रागावर ताबा ठेवा. चौफेर सावध रहा. धोका पत्करू नका. नोकरीत प्रशंसा होईल. नवा परिचय फायेदशीर. राजकीय, सामाजिक क्षेत्रात लोकप्रियता वाढेल. शुभ दि. 26, 27
मकर –  अहंकार दूर ठेवा
चंद्र, शुक्र त्रिकोणयोग. चातुर्याने ध्येय गाठावे लागेल. अहंकाराचा दर्प येऊ देऊ नका. संताप आवरा. नम्रता ठेवा. धंद्यात लाभ होईल. अरेरावी नको. राजकीय, सामाजिक क्षेत्रात प्रतिष्ठेचा प्रश्न करू नका. लोकसंग्रह वाढवा. दूरदृष्टी ठेवा. शुभ दि. 27, 28
कुंभ – महत्त्वाच्या वस्तू सांभाळा
सूर्य, बुध युती. भावना व कर्तव्य यांचा योग्य मेळ घालून निर्णय घेणे कठीण वाटेल. प्रकृतीची काळजी घ्या. महत्त्वाच्या वस्तू, कागदपत्रे सांभाळा. नात्यात, मैत्रीत गैरसमज होतील. राजकीय, सामाजिक क्षेत्रात तटस्थ भूमिका घ्या. शुभ दि. 23, 24
मीन – वाद वाढवू नका
चंद्र, शुक्र त्रिकोणयोग. अधिकाराने कुणालाही जिंकता येत नाही हे लक्षात ठेवा. मधुर वाणी, दुसऱ्याच्या हितांची चर्चा या गोष्टी महत्त्वाच्या. नोकरीधंदा टिकवा. वाद वाढवू नका. राजकीय, सामाजिक क्षेत्रात सर्वांचे मत जाणून घ्या. शुभ दि. 23, 24