हिंदुस्थानकडे 190 अण्वस्त्रे, आणखी 35 बॉम्ब बनवता येईल एवढा प्लुटोनियम साठा; अमेरिकन थिंक टँकचा दावा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

क्षेपणास्त्रांसाठी राखून ठेवली आहेत. हिंदुस्थानकडे समृद्ध प्लुटोनियमदेखील असल्याचा दावा अहवालात करण्यात आला आहे. जगभरात नऊ देशांकडे एकूण 12,187 अण्वस्त्रे असल्याचे अहवालात नमूद आहे. रशिया आणि अमेरिकेकडे पाच हजारांपेक्षा जास्त अण्वस्त्रे आहेत.

देशात 730 किलो प्लुटोनियम

हिंदुस्थानकडून सातत्याने आण्विक क्षमतेचा विस्तार आणि आधुनिकीकरण करण्यात येत आहे. गेल्या सहा वर्षांमध्ये हिंदुस्थानने 40 अण्वस्त्रे बनविली आहेत. त्यापैकी दहा अण्वस्त्रे याच वर्षी तयार करण्यात आली आहे. अहवालानुसार, हिंदुस्थानकडे या वर्षीच्या सुरुवातीला 730 किलो प्लुटोनियम होते. त्यातून 225 अण्वस्त्रे बनविता येऊ शकतात. हा केवळ अंदाज असून प्रत्यक्ष संख्या जास्त असू शकते, असे अहवालात म्हटले आहे.

समुद्रात तयार होतेय आण्विक कवच

हिंदुस्थानकडे आण्विक ऊर्जेवर चालणाऱ्या तीन पाणबुडय़ांचा ताफा सज्ज आहे. या पाणबुड्यांमध्ये मध्यम आणि लांब पल्ल्याची बॅलिस्टिक क्षेपणास्त्रे आहेत. पाणबुडय़ांच्या माध्यमातून हिंदुस्थान आण्विक कवच बनवत असल्याचे अहवालात म्हटले आहे.

अनेक लक्ष्य भेदण्याची क्षमता

‘एफएएस’च्या अहवालात ‘अग्नी-5’ या नव्या क्षेपणास्त्राचाही उल्लेख करण्यात आला आहे. त्यामुळे एक क्षेपणास्त्र अनेक अण्वस्त्रे वाहून नेण्यास सक्षम झाले आहे. या क्षेपणास्त्राच्या टप्प्यात चीन, पाकिस्तान, रशिया, तुर्किये, पोलंडसह युरोप व आफ्रिकेचा मोठा हिस्सा येतो.