
ईडी, सीबीआय लावा, चौकशा करा, अटक करा! सगळा त्रास सहन करण्याची आमची तयारी आहे, पण 2029 समोर आहे हे विसरू नका, असा इशारा मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी फडणवीस सरकारला दिला.
मराठा आंदोलनाला पाठबळ देणाऱ्यांच्या मागे चौकशीचा ससेमिरा लावण्यात येत असल्याबद्दल जरांगे यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. आंदोलनासाठी ज्यांनी मदतीचा हात दिला, त्यांच्यामागे चौकशा लावण्यात येत आहेत. आम्ही सगळे त्याला सामोरे जायला तयार आहोत. पण, आरक्षणावर तडजोड करणार नाही, असे जरांगे यांनी स्पष्ट केले.



























































