
दिल्लीतील प्रदूषण कमी करण्यासाठी अनेक उपाययोजना करण्यात आल्या असल्या तरी वायू प्रदूषण कमी होत नाही. त्यामुळे आता दिल्ली सरकारने काही नवीन बदल करण्याचे ठरवले आहेत. नोव्हेंबरमध्ये दिल्लीतील प्रदूषणाची पातळी वाढण्याची शक्यता असल्याने शहरातील पार्किंग शुल्कात दुप्पट वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच कार्यालयांमध्ये 1 नोव्हेंबर ते 28 फेब्रुवारी 2027 या पंपन्यांनी कर्मचाऱयांना 50 टक्के वर्प फ्रॉम होम करण्याची सुविधा द्यावी असे निर्देश दिले आहेत.
खासगी वाहनांचा वापर कमी करण्यासाठी दिल्लीतील अधिपृत पार्किंगच्या ठिकाणी आकारले जाणारे शुल्क 1 नोव्हेंबरपासून दुप्पट करण्यात येणार आहे. हा निर्णय 28 फेब्रुवारी 2027 पर्यंत लागू राहील. मात्र दिल्ली मेट्रो रेल काॅर्पोरेशनच्या मालकीच्या आणि व्यवस्थापनाखालील पार्ंकग सुविधांना या निर्णयातून वगळण्यात आले आहे. दिल्ली महानगरपालिकेच्या अंतर्गत येणारी कार्यालये आता सकाळी साडेआठ ते संध्याकाळी पाच वाजेपर्यंत सुरू राहतील, तर दिल्ली सरकारच्या अंतर्गत कार्यालयांची वेळ सकाळी 10 ते संध्याकाळी 6.30 अशी असेल. कार्यालयांमध्ये उपस्थित राहणाऱया कर्मचाऱयांची संख्या 50 टक्क्यांनी कमी करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. यानुसार कार्यालयातील निम्मे कर्मचारी घरून काम करतील, तर उर्वरित 50 टक्के कर्मचारी कार्यालयातून काम करतील.
बांधकाम आणि पाडकामावर निर्बंध
धुळीमुळे होणारे प्रदूषण कमी करण्यासाठी बांधकाम आणि पाडकामाच्या कामांवरही कठोर निर्बंध जाहीर करण्यात आले आहेत. 10 डिसेंबर 2026 ते 20 जानेवारी 2027 या कालावधीत बांधकाम आणि पाडकामाच्या कामांवर पूर्ण बंदी असेल. याशिवाय, 1 नोव्हेंबर 2026 ते 31 जानेवारी 2027 दरम्यान धूळ निर्माण करणाऱया पाडकामाच्या तसेच बाहेरील नागरी बांधकामाच्या कामांवरही बंदी लागू करण्यात येणार आहे.

























































