
कॅनरा बँकेने ग्रॅज्युएट अप्रेंटिसच्या 3 हजार 500 पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. 1 ऑक्टोबर 2026 पासून अर्ज भरण्यास सुरुवात होणार असून 17 ऑक्टोबर 2026 अखेरची तारीख आहे. या भरतीसंबंधी सविस्तर माहिती बँकेची अधिपृत वेबसाइट canarabank.bank.in वर देण्यात आली आहे.
या पदासाठी अर्ज करणारा उमेदवार कमीत कमी पदवी उत्तीर्ण असायला हवा. अर्ज करण्यासाठी 500 रुपयांचे शुल्क भरावे लागणार आहे. आरक्षित प्रवर्गातील उमेदवारांना फी मध्ये सूट देण्यात आली असून निर्धारित नियमांनुसार कमाल वयोमर्यादेतही त्यांना सूट दिली जाईल. उमेदवारांची मुलाखतीद्वारे निवड केली जाणार असून निवड झालेल्या उमेदवाराला 16,650 रुपये विद्यावेतन दिले जाणार आहे. अप्रेंटिसशिपचे प्रशिक्षण 1 वर्षासाठी असणार आहे.


























































