
आयआयटी मुंबईचा विद्यार्थी साहिल वाकोडेच्या मृत्यूचा नीट तपास व्हावा, आणि दोषीविरोधात कठोर कारवाई करण्यात यावी, या मागणीसाठी साहिलच्या आई-वडिलांनी मुंबईतील आझाद मैदानात सोमवारपासून आंदोलनाला सुरुवात केली आहे.
जोपर्यंत मुलाच्या मृत्यूस जबाबदार असलेल्या व्यक्तींवर कारवाई केली जात नाही तोपर्यंत बेमुदत उपोषण सुरूच ठेवण्याचा निर्धार त्यांनी केला आहे. साहिल वाकोडे आयआयटी मुंबईत ऊर्जा वित्रान आणि अभियांत्रिकीच्या द्वितीय वर्षात शिकत होता. 18 सप्टेंबरला संध्याकाळी वसतिगृहातील खोलीत तो मृतावस्थेत आढळून आला होता. जातीय भेदभाव झाल्यामुळे त्याने आत्महत्या केली, असा आरोप साहिलच्या पालकांनी केला आहे. तर आयआयटी मुंबईने प्रा. सूर्यनारायण दुल्ला यंना रजेवर पाठवले आहे.



























































