हरकती व दावे दाखल करण्याची मुदत दोन महिन्यांनी वाढवून द्या, काँग्रेसची मागणी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

राज्यात सध्या सुरू असलेल्या एसआयआर मोहिमेअंतर्गत मतदार यादीमधील नावासंदर्भात दावे व हरकती दाखल करण्यासाठी निवडणूक आयोगाने 12 ऑक्टोबरपर्यंतची मुदत दिलेली आहे. ही मुदत अत्यंत अपुरी आहे. सध्या येत असलेल्या तांत्रिक अडचणी व मोठय़ा प्रमाणावरील हरकतींची संख्या पाहता हा वेळ पुरेसा नाही. त्यामुळे आणखी दोन महिन्यांनी वेळ वाढवून द्या, अशी मागणी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केली आहे.

हर्षवर्धन सपकाळ यांनी राज्याचे मुख्य निवडणूक आयुक्त एस. चोक्कलिंगम यांना पत्र पाठवले आहे. काँग्रेसच्या शिष्टमंडळाने एसआयआरसंदर्भात आपली भेट घेऊन चर्चा केली होती. त्यातील प्रमुख मागणी दावे व हरकती दाखल करण्यास दोन महिन्यांची मुदतवाढ देण्याची मागणी केली होती, पण निवडणूक आयोगाने फक्त 12 दिवसांचा कालावधी दिला आहे.