
जगात 28 हून अधिक देशांमध्ये मनुष्यबळाची मोठी मागणी असून, महाराष्ट्रातील तरुणांना आंतरराष्ट्रीय स्तरावर रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी शासन प्रयत्नशील आहे. असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले. एसएनडीटी महिला विद्यापीठात काwशल्य,रोजगार,उद्योजकता व नाविन्यता विभागाच्या वतीने ’पंडित दीनदयाल उपाध्याय महारोजगार मेळाव्याचा कोकण व नाशिक विभागातील सर्व जिह्यात’ ऑनलाईन शुभारंभ करण्यात आला.


























































