
बोरिवली येथील संजय गांधी राष्ट्रीय उद्यान येथे वन्य जीव सप्ताहाला आजपासून सुरुवात झाली आहे. गुरुवार, 8 ऑक्टोबरपर्यंत हा सप्ताह सुरू राहणार आहे. हा सप्ताह वन्य जीव अभ्यासकांसाठी एक उत्तम पर्वणी ठरणार आहे.
संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाचे वनसंरक्षक आणि संचालक अनिता पाटील यांच्या हस्ते आज या सप्ताहाला सुरुवात करण्यात आली. यावेळी मुंबई मार्चचे थवानी, वन्य जीव विषयक कायदेतज्ञ धीरज मिरजकर, मानद वन्य जीवरक्षक पवन शर्मा, दक्षिण उपसंचालक किरण पाटील, सहाय्यक वनसंरक्षक विश्वजित जाधव, संदीप पाटील, आशीष हिवरे तसेच वनपरिक्षेत्र अधिकारी प्रदीप चव्हाण, योगेश महाजन, विजय बारब्दे, अभिजित माने आणि उद्यानातील कर्मचारी वर्ग उपस्थित होते.


























































