
महाराष्ट्र विधान परिषद निवडणुकीसाठी काँग्रेसकडून उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली आहे. नागपूर पदवीधर मतदार संघासाठी अभिजीत वंजारी यांना पुन्हा एकदा उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. तर दुसरीकडे पुणे मतदारसंघातून जयंत आसगावकर यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. तर अमरावती शिक्षक मतदार संघामधून अपेक्षेप्रमाणे आदिती पोहोरे यांना उमेदवारी जाहीर झाली आहे.

























































