
तामीळनाडूत मातृभाषेला किती महत्त्व दिले जाते, याचा प्रत्यय आला आहे. तामीळनाडूमध्ये एका राष्ट्रीय महामार्गावरील फलकावर हिंदी लिहिणाऱया दोन सहायक अभियंत्यांना तामीळनाडू सरकारने निलंबित केले आहे. तामीळनाडूमध्ये केवळ तमीळ आणि इंग्रजी अशा दोन भाषांत फलकावर लिहिण्याचा नियम असताना हिंदीत लिहिल्याने ही कारवाई करण्यात आली आहे.
तुत्तुपुडी जिह्यातील सत्तानपुलम-नाझरेथ राज्य महामार्गाशी संबंधित आहे. येथे नव्या फलकांवर तमीळ आणि इंग्रजीसोबतच शहरांची नावे हिंदीतही लिहिण्यात आली होती. हिंदीत नावे लिहिणे हे राज्याच्या द्विभाषिक धोरणाचे उल्लंघन आहे. हिंदी मजपूर हटवण्यासोबतच दोन्ही अधिकाऱयांविरुद्ध विभागीय कारवाई सुरू करण्यात आली आहे. 2026 मध्ये हिंदीत लिहिलेली नावे पुसण्याची ही तिसरी घटना आहे. यापूर्वी मार्चमध्ये तिरुचिरापल्ली विभागीय रेल्वे कार्यालयाच्या नव्या इमारतीच्या प्रवेशद्वारावर लिहिलेले कर्तव्य द्वार पुसण्यात आले होते. मार्चमध्येच सिंगानल्लूर रेल्वे स्थानकावरील हिंदीत लिहिलेले सिंगानल्लूर हे नाव द्रविडी पक्षांच्या कार्यकर्त्यांनी काळे केले होते.
राज्यात ‘द्विभाषिक सूत्र’ धोरण
तामीळनाडूमध्ये दीर्घकाळापासून द्विभाषिक सूत्राचे धोरण लागू आहे. याअंतर्गत सरकारी कामकाज आणि शिक्षणात तमीळ व इंग्रजीचा वापर केला जातो. राज्य सरकार हिंदीचा समावेश असलेल्या त्रिभाषिक धोरणाला विरोध करत आले आहे. तामीळनाडूच्या भाषा धोरणाचा आधार 1956 चा तामीळनाडू अधिपृत भाषा अधिनियम आहे, ज्यामध्ये तमीळला राज्याची अधिपृत भाषा बनवण्यात आले आहे.

























































