शिवसेनेकडून शिक्षक आणि पदवीधर निवडणुकीसाठी उमेदवार जाहीर

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

विधान परिषदेच्या शिक्षक आणि पदवीधर निवडणुकीसाठी शिवसेनेकडून दोन उमेदवार जाहीर करण्यात आले आहेत. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने अमरावती शिक्षक मतदारसंघासाठी दत्तात्रय श्रीराम लहाने आणि छत्रपती संभाजीनगर पदवीधर मतदारसंघासाठी दिलीप हरिभाऊ घुगे यांची उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे, अशी माहिती शिवसेना मध्यवर्ती कर्यालयातून प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकाद्वारे कळविण्यात आली आहे.