
पनवेल तालुक्यातील नानोशी गावाला भूकंपाचा धक्का बसला. या भूकंपाची तीव्रता २.५ रिश्टर स्केल इतकी होती हादरे सौम्य होते मात्र धक्क्यानंतर गावकऱ्यांनी घराबाहेर पळ काढला. गावकरी आपल्या मुलाबाळांसह जातिमध्थळी बसले, सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही. घटनेनंतर महसूल प्रशासनाने नानोशी तसेच आजूबाजूच्या परिसराची पाहणी केली.
नानोशी गावात शनिवारी उशिरा भूकंपाचा धक्का बसला, जमीन हादरल्याने गावकऱ्यांनी घराबाहेर पळ काढला, सुरक्षितस्थळी थोडावेळ थांबल्यानंतर अनेक जण पुन्हा घरात परतले. मात्र नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. याची माहिती मिळताच नानोशी येथील तलाठ्यांनी प्रत्यक्ष गावात जाऊन पाहणी केली. भूकंपाची नोंद भूकंपमापन केंद्रावर झाली असली तरी परिसरात कोणतीही जीवितहानी, वित्तहानी झाली नाही. या घटनेनंतर स्थानिक प्रशासनाने आवश्यक खबरदारी घेतली असून सध्या परिस्थिती पूर्णपणे सामान्य आहे.





























































