
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा विवस्त्र अवस्थेतील पुतळा फान्समधील स्ट्रासबर्ग येथे असलेल्या युरोपियन संसदेच्या इमारतीमध्ये बसवण्यात आला आहे. साडेआठ फूट उंचीच्या या पुतळ्याला 23 कॅरेट सोन्याचा मुलामा देण्यात आलेला आहे. ‘किंग ऑफ इनजस्टिस’ अर्थात ‘अन्यायाचा राजा’ असे नाव या पुतळ्याला संबोधण्यात येत आहे. डॅनिश कलाकार जेन्स गाल्शिओट यांनी हे शिल्प साकारले असून याद्वारे त्यांनी ट्रम्प यांच्या नेतृत्वावर आणि त्यांच्या धोरणांवर उपरोधिक टीका केली आहे.
युरोपियन संसदेच्या दोन इमारतींना जोडणाऱ्या वर्दळीच्या ठिकाणी हे शिल्प ठेवण्यात आले आहे. गुरुवारपर्यंत ते तेथे प्रदर्शनासाठी ठेवले जाणार आहे. सोन्याचा मुलामा देण्यात आलेला ट्रम्प यांचा पुतळा एका लहान आणि कपडे घातलेल्या व्यक्तीच्या खांद्यावर ठेवलेला आहे. ट्रम्प यांचे वजन पेलणारी व्यक्ती त्यांच्या ओझ्याखाली दबल्याचे यातून दाखवण्यात आले आहे.
ट्रम्प यांच्या हातमध्ये न्यायाचा तराजू आणि गोल्फ खेळण्यासाठी वापरली जाणारी लांब स्टीक आहे. गोल्फ चेंडूचा आकार पृथ्वीसारखा दाखवण्यात आले आहे. पुतळ्याच्या खाली असणाऱ्या चौथऱ्यावर ‘ऑरेंज प्लेग’ असेही लिहिण्यात आले आहे.
Golden naked Trump statue unveiled at European Parliament
The 2.5 meter sculpture, titled ‘The Orange Plague’, was created by Danish artist Jens Galschiøt and depicts Trump sitting on another figure’s shoulders while holding a golf club https://t.co/y3DcXd7KXc
— non aesthetic things (@PicturesFoIder) October 7, 2026




























































