
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या विरोधात दादर येथील छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर आंदोलन करणाऱ्या आंदोलकांना पोलिसांनी रोखल्याने आणि सक्तीने ताब्यात घेतले होते. यावेळी पोलिसांनी महिला, लहान मुलं, विद्यार्थी असं काहीही न बघता सरसकट सर्वांना उचलून गाड्यांमध्ये कोंबले होते. यावेळी एका महिलेला तिच्या लहान मुलासोबत गाडीत कोंबतानाचा फोटो हिंदुस्थान टाईम्स या वृत्तपत्राने छापला आहे. या फोटोवरून सध्या सत्ताधाऱ्यांवर व पोलिसांवर मोठ्या प्रमाणात टीका होत आहे. शिवसेना नेते, खासदार संजय राऊत यांनी देखील तो फोटो शेअर करत सत्ताधाऱ्यांवर टीका केली.
राजू शिंदे (HT मुंबई) यांच्या या छायाचित्राने महाराष्ट्राच्या गृहखात्याचे निर्दयी चेहरा उघड केला आहे. आई-बाळाची ती हाक, डोळ्यांतली भीती आणि पोलिसांचा तो पाशवी हात —
हे फक्त छायाचित्र नाही, हे लोकशाहीच्या बिघडलेल्या आरोग्याचं निदान आहे.
हृदयद्रावक, चीड आणणारं आणि आयकॉनिक. जेव्हा शांततेत आवाज उठवणारे आदिवासी विद्यार्थी किंवा नागरिक फरफटत पोलिस बसवर चढवले जातात, तेव्हा गृहखात्याची “कायदा-सुव्यवस्था” ही निर्दयी आणी भावना शून्य बनते.राजा किती क्रूर आणि खोटारडा आहे हे दिसते,
देवेंद्र फडणवीस,मोदी वैगरे लोकांनी समाजाला कोणत्या नरकात ढकलले आहे ते या चित्रातून दिसते,
देशातील प्रत्येक वर्तमान पत्राने हे चित्र पाहिल्या पानावर प्रसिद्ध केले पाहिजे!
@narendramodi
@RahulGandhi
@nytimesworld
@washingtonpost
@UNHumanRights— Sanjay Raut (@rautsanjay61) October 12, 2026
”राजू शिंदे (हिंदुस्थान टाईम्स मुंबई) यांच्या या छायाचित्राने महाराष्ट्राच्या गृहखात्याचे निर्दयी चेहरा उघड केला आहे. आई-बाळाची ती हाक, डोळ्यातली भीती आणि पोलिसांचा तो पाशवी हात हे फक्त छायाचित्र नाही, हे लोकशाहीच्या बिघडलेल्या आरोग्याचं निदान आहे. हृदयद्रावक, चीड आणणारं आणि आयकॉनिक. जेव्हा शांततेत आवाज उठवणारे आदिवासी विद्यार्थी किंवा नागरिक फरफटत पोलिस बसवर चढवले जातात, तेव्हा गृहखात्याची ‘कायदा-सुव्यवस्था’ ही निर्दयी आणी भावना शून्य बनते. राजा किती क्रूर आणि खोटारडा आहे हे दिसते, देवेंद्र फडणवीस, मोदी वैगरे लोकांनी समाजाला कोणत्या नरकात ढकलले आहे ते या चित्रातून दिसते, देशातील प्रत्येक वर्तमान पत्राने हे चित्र पाहिल्या पानावर प्रसिद्ध केले पाहिजे”, असे संजय राऊत यांनी ट्विट केले आहे.
ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्यासाठी देशभरात आंदोलन पेटले आहे. रविवारी सीजेपीच्या कार्यकर्त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर अचानक आंदोलन छेडले. ते आंदोलन पांगवण्यासाठी पोलीस त्या आंदोलकांना गाडय़ांमध्ये कोंबून घेऊन जात होते. त्यामुळे शिवसेना नेते, युवासेना प्रमुख, आमदार आदित्य ठाकरे आक्रमक झाले. . आदित्य ठाकरे यांनी शिवसेना भवनाबाहेर पोलिसांच्या व्हॅनवर चढून ती अडवून धरली. आंदोलकांना सोडा अन्यथा गाडी जाऊ देणार नाही अशी भूमिका त्यांनी घेतली. बघता-बघता हजारो शिवसैनिक शिवसेना भवनाजवळ पोहोचले. अखेर पोलिसांना नमते घेऊन आंदोलकांना सोडावे लागले.

























































