
फॅशन, नृत्य आणि अभिनयाने प्रेक्षकांना भुरळ पाडणारी मराठमोळी अभिनेत्री म्हणजे संस्कृती बालगुडे. तिच्या स्टायलिश अंदाजामुळे ती कायम चर्चेत असते. तिने नुकतेच इंस्टाग्रामवर काही फोटो शेअर केले आहेत. पारंपरिक आणि आधुनिकतेचा एक अत्यंत सुंदर संगम तिने केला आहे. हिरव्यागार निसर्गरम्य वातावरणात तिने काढलेले फोटो लक्षवेधी ठरत आहेत.

संस्कृतीने या खास फोटोशूटसाठी गडद लाल रंगाची साडी नेसली आहे, ज्याचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे या साडीवर देवनागरी लिपीतील मंत्र किंवा धार्मिक श्लोक छापलेले आहेत, ज्यामुळे या साडीला एक आध्यात्मिक, पारंपरिक आणि अगदी युनिक लूक मिळाला आहे. 
या साडीवर तिने केस मोकळे सोडले असून केसांमध्ये हलके वेव्ह्ज देऊन त्यांना एक मॉडर्न टच दिला आहे. त्यात तिचे सुंदर हायलाइट्स तिच्या चेहऱ्यावर अगदी शोभून दिसत आहेत.
तिचा मेकअप अतिशय साधा तरीही ग्लॅमरस असा आहे, डोळ्यांना आकर्षक आयलाइनर, मस्करा, नीटनेटके आयब्रोज आणि ओठांवर शोभून दिलेली लिपस्टिक तिच्या चेहऱ्याचे सौंदर्य आणखी खुलवत आहे.

दागिन्यांच्या बाबतीत तिने गळ्यात पारंपरिक आणि आकर्षक असा लाल व सोनेरी डिझाइनचा नेकलेस परिधान केला असून, हातात बोटांमध्ये स्टायलिश रिंग्ज घातल्या आहेत. 
हिरव्यागार पार्श्वभूमीवर, एका खडकावर बसून कॅमेऱ्याच्या लेन्ससमोर दिलेला हा लूक अत्यंत देखणा, शांत आणि आपल्या समृद्ध सांस्कृतिक मूल्यांची जोपासना करणारा भासतो.

या संपूर्ण लूकचे मुख्य आकर्षण म्हणजे तिच्या पायातील हेवी ऑक्डाइज्ड पैंजण, जे अनवाणी पायांवर अत्यंत सुंदर दिसत आहेत.




























































