
इटलीमध्ये महागाईविरोधात जनता रस्त्यावर उतरली आहे. महागाई आणि युद्धाविरोधात शनिवारी काढण्यात आलेल्या मोर्चाला हिंसक वळण लागले. मिलानच्या मध्यवर्ती भागात आंदोलक आणि पोलिसांमध्ये राडा झाला. यानंतर आंदोलकांना दुकानं लुटली आणि स्थावर मालमत्तेची जाळपोळ केली. परिस्थिती बिघडल्यानंतर पोलिसांनी अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या आणि पाण्याचे फवारे मारत गर्दी पांगवण्याचा प्रयत्न केला. या संघर्षात दोन पोलीस अधिकारी जखमी झाले असून 50 हून अधिक आंदोलकांना ताब्यात घेण्यात आले आहे.
मिलानमध्ये वाढत्या महागाईविरुद्धच्या मोर्चाची सुरुवात अत्यंत शांततापूर्ण मार्गाने झाली होती. मात्र, काही वेळाने चेहऱ्यावर मास्क घातलेल्या काही आंदोलकांनी पोलिसांच्या दंगल नियंत्रण पथकावर दगडफेक केली. त्यानंतर परिस्थिती अत्यंत तणावपूर्ण बनली आणि अनेक भागात हिंसाचाराला सुरुवात झाली. आंदोलकांना काही दुकानं लुटली, तसेच आगी लावल्या. आंदोलन पसरल्याने मिलानमधील जगप्रसिद्ध पियाजा डेल डुओमो चौक आणि महागड्या वस्तुंसाठी ओळखली जाणारी बाजारपेठ मोकळी झाली. यामुळे दुकानदारांना मोठे नुकसान सोसावे लागले.
मेलोनींच्या देशात जनतेचं बंड, महागाईविरोधात हिंसक निदर्शनं; मिलानमध्ये दुकानं लुटली, आगी लावल्या, 50 जणांना अटक https://t.co/Lbse7ouE1c
— Saamana Online (@SaamanaOnline) October 18, 2026
आंदोलकांना पांगवण्यासाठी पोलिसांनी अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या. पाण्याचे फवारे मारले. या संघर्षावेळी दोन पोलीस जखमी झाले, तर पोलिसांनी अल्पवयीन मुलांसह 50 हून अधिक जणांना ताब्यात घेतले. या घटनेनंतर इटलीच्या पंतप्रधान जॉर्जियो मेलोनी यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत हिंसक आंदोलनाचा तीव्र शब्दांमध्ये निषेध केला. निदर्शने करण्याचा अधिकार आहे, पण आपल्या शहरांना आगी लावणे नाही, अशा शब्दात मेलोनी यांनी टीका केली.
Ho grande rispetto per le migliaia di persone che oggi hanno manifestato pacificamente, anche partecipando alla mobilitazione indetta dalla CGIL che ha visto anche la partecipazione dei leader della sinistra. Qualunque siano le idee per le quali si manifesta, la partecipazione è alla base di qualunque sana democrazia.
Dall’altro lato, però, non possiamo ignorare quanto accaduto in altre piazze italiane. A Milano, come mostrano queste immagini, lanci di pietre contro le Forze dell’Ordine, agenti feriti, danneggiamenti e violenze che hanno costretto a interrompere il corteo. A Torino sono state fermate persone con sanpietrini e martelletti frangivetro. A Bologna i disordini hanno portato alla chiusura precauzionale della stazione ferroviaria.
Teppisti che sfruttano le manifestazioni per seminare il caos, aggredire chi garantisce la sicurezza e tenere in ostaggio intere città.
Manifestare è un diritto. Mettere a ferro e fuoco le nostre città non lo è.
Rinnovo la mia richiesta alle opposizioni: non siano ambigue su questo. Condannino senza ambiguità queste violenze e lancino un appello chiaro affinché ogni mobilitazione sia pacifica.
Di fronte a scene del genere, il rifiuto deve essere unanime. Ogni reticenza diventa giustificazione. Il silenzio non è accettabile.
— Giorgia Meloni (@GiorgiaMeloni) October 17, 2026
महापौरांनी व्यक्त केला संताप
मिलानचे महापौर ग्यूसेप्पे सेला यांनीही सुरक्षा कर्मचाऱ्यांवरील हल्ला आणि शहराच्या मालमत्तेचे नुकसान करण्याच्या कृत्याचा निषेध केला. कायदा-सुव्यवस्था राखणाऱ्या सुरक्षा रक्षकांवर हल्ले करणे आणि शहराचे अतोनात नुकसान करणे कोणत्याही परिस्थितीत योग्य नाही, असे ते म्हणाले.
बोलोन्यातही धुडगूस
बोलोन्या येथील मुख्य रेल्वे स्टेशनवर हुड घातलेल्या तरुणांच्या टोळक्याने सुरक्षा दलांवर बाटल्या, स्मोक बॉम्ब आणि लोखंडी बॅरिकेड्स भिरकावले. पोलिसांनी अश्रुधूर आणि वॉटर कॅननचा वापर करत परिस्थिती नियंत्रणात आणली. खबरदारी म्हणून येथील मध्यवर्ती रेल्वे स्टेशन काही काळ बंद ठेवावे लागले.



























































