
मोबाईल देण्यास नकार दिला म्हणून चौघांनी मित्राची हत्या केल्याची धक्कादायक घटना मुंब्यात घडली आहे. इलियाज नियाज अहमद कुरेशी उर्फ सलीम असे मृताचे नाव आहे. याप्रकरणी मुंब्रा पोलिसांनी परमेश्वर अंडागळे, मोहम्मद फिरोज हनीफ खान, अनिल चौरे आणि सुनील पगारे या चौघांना अटक केली आहे.
सलीम यांनी आपला मोबाईल घेतल्याची माहिती परमेश्वरला मिळाली. हा मोबाईल परत मागण्यासाठी परमेश्वर याच्यासह मोहम्मद फिरोज, अनिल चौरे आणि सुनील हे सलीम यांच्याकडे गेले. मात्र सलिम यांनी मोबाईल देण्यास नकार दिल्याने त्यांच्यात वाद झाला. हा वाद विकोपाला गेला आणि चौघांनी सलीम यांना लाकडी दांडका, कमरेचा पट्टा, पाईपने बेदम मारहाण केली. या मारहाणीत सलीमचा मृत्यू झाला. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन वरिष्ठ पोलीस निरीक्षक गणेश जवादवाड यांच्या मार्गदर्शनाखाली तपासासाठी तीन पथके तयार करण्यात आली. अवघ्या तासाभरात पोलीस पथकाने चौघांना केली. ठाणे न्यायालयाने त्यांना 19 ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली.


























































