खांदेश्वर पोलिसांनी लावला नऊ चोरींच्या गुन्ह्यांचा छडा, सहा लाखांचा मुद्देमाल हस्तगत

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

खांदेश्वर पोलिसांनी चार सराईत चोरट्यांना त्यांच्याकडून पाच लाख 87 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. या चोरांची कसून चौकशी केल्यानंतर त्यांनी घरफोडीच्या गुह्यांची कबुली दिली आहे.

खांदेश्वर येथील विजयलक्ष्मी इलेक्ट्रिक अॅण्ड हार्डवेअर या दुकानात चोरी झाल्यानंतर चोरांना पकडण्यासाठी जोरदार पोलिसांनी जोरदार फिल्डिंग लावली. परिसरातील सीसीटीव्ही तपासले. त्यानंतर पोलिसांनी नहीम आलम मोहम्मद जलाल (20), तजमुल कमरूल खान (24), आशफाक असिरुद्दीन आलम (32) आणि नाजीम मोहम्मद जलाल शेख (21) या चौघांवर झडप घातली. नहीम हा हॉटेलमध्ये कुक म्हणून काम करीत होता तर अन्य तिघे हे एपीएमसीच्या भाजी मार्केटमधील एका गाळ्यावर कामाला होते. त्यांची कसून चौकशी केली असता त्यांनी नऊ ठिकाणी घरफोडी केल्याचे कबूल केले.

ही कारवाई पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे, सहपोलीस आयुक्त दीपक साकोरे, पोलीस उपायुक्त रश्मी नांदेडकर, सहाय्यक पोलीस आयुक्त मयुर भुजबळ, वरिष्ठ पोलीस निरीक्षक स्मिता ढाकणे, पोलीस निरीक्षक सचिन परदेशी यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप माने, उत्तम घेगडमल, पोलीस हवालदार वैभव शिंदे, नितीन वाघमारे, अमित धुमाळ, रणजित पाटील, नवनाथ नरळे, धिरेंद्र पाटील, मुबारक तडवी, सचिन पवार, ऋषिकांत परदेशी आणि सुनील गायकवाड यांनी केली आहे.