
शिवसेना नेते, युवासेनाप्रमुख, आमदार आदित्य ठाकरे यांनी आज मुंबईतील विलेपार्ले येथील लोकमान्य टिळक मैदानाची पाहणी केली. यानंतर आदित्य ठाकरे यांनी माध्यमांशी संवाद साधला. मुंबईतील कुठलंही मैदान ढापण्याचा कितीही मोठा प्रयत्न झाला तरी तो हाणून पाडायचा. कोणी पत्रे लावायला आले तर ते लावू द्यायचे नाहीत. जे कोण असतील त्यांना बरोबर उत्तर द्यायचं, अशा सूचना शिवसैनिकांना देत आदित्य ठाकरे यांनी सरकारला इशारा दिला आहे.
आज आपण ज्या मैदानावर आहोत हे जवळपास साडेतीन चार एकरचं मैदान आहे. हरुन खान यांच्या मतदारसंघात साडेबारा एकरचं मोठं मैदान आहे. जवळपास मुंबईतील १६ एकर जागा ही एका ट्रस्टला दिली जात आहे. १६ एकरमध्ये अंधेरीतील छत्रपती शिवाजी महाराज स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स आहे. तिथे क्रिकेटचं ग्राउंड आहे, सायकलिंग ट्रॅक आहे, वॉकिंग ट्रॅक वेगळा आहे, टेनिस वैगरे हे सगळं आहे. हे दुसरं मैदान आहे. आणि तिसरा असाच प्लॉट हा देखील एकाच संस्थेला दिला जातोय. दुसरीकडे नेव्हील डिसोजा फुटबॉल टर्फ आपण पाहतोय, तिथे देखील आमचा लढा सुरू आहे. परवा मी मुलुंडला जाऊन आलो. तिथे तर मुलुंडला अक्षरशः धक्का बसेल अशी गोष्ट आहे. एका बाजूला स्पोर्ट्स कॉम्प्लेक्सचं आरक्षण आणि दुसऱ्या बाजूला पेट्रोलपंपचं आरक्षण असताना देखील दोन्ही प्लॉट्स पेट्रोलपंपसाठी देण्यात आलेले आहेत. एकंदर काय तर मुंबईतील मोकळी मैदानं, स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स, जे चांगले गार्डन दिसताहेत ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे स्वतःच्या मित्रांच्या, आवडत्या बिल्डरांच्या किंवा मग स्वतःच्या आमदारांच्या घशात टाकत आहेत. पंतप्रधान म्हणाताहेत, स्क्रीनवर जास्त राहू नका, मैदानात राहा. स्वतः मुख्यमंत्री फडणवीस म्हणाताहेत, स्क्रीनवर जास्त बघू नका, मैदानात उतरा. पण मुंबईची सगळी खुली मैदानं जर तुम्ही तुमच्या मित्रांच्या घशात टाकणार असाल तर मग नेमकं कुठल्या मैदानावर राहायचं? आणि आता ऐकतो शिवाजी पार्क देखील एमसीए मागायला निघालेली आहे. तरी असं कुठलंही मैदान ढापण्याचा कितीही मोठा प्रयत्न झाला तरी तो हाणून पाडायचा. कोणी पत्रे लावायला आले तर ते लावू द्यायचे नाहीत. जे कोण असतील त्यांना बरोबर उत्तर द्यायचं. हे आज इथे आलेल्या शिवसैनिक आणि युवासैनिकांना सांगितलं आहे, असे आदित्य ठाकरे म्हणाले.
परिवहन मंत्र्यांना रॅपिडोसोबत मिटींग करायला वेळ आहे पण मराठी रिक्षाचालकांसाठी नाही – संजय राऊत
तुमचं सरकार बंसलं आणि तुम्ही मैदानं ढापायला लागलात म्हणून काळजी वाटायला लागली. आधी आमचं सरकार असताना मुंबईतील मैदाने ही मोकळी होती. एवढी वर्षे मैदान मोकळे होते कोण ढायपायला आलं होतं का? कोणी नाही. भाजपला वाटत असेल की, काळजी आता का वाटतेय कारण आता भाजपचं सरकार आलंय, असा टोला आदित्य ठाकरे यांनी लगावला.
एवढं मोठं हे मातीचं मैदान आहे. जे कोणी सांगताहेत आम्ही ५० कोटी टाकू, अमूक टाकू, तमूक टाकू. तुम्हाला जर काही पैसे खर्च करायचेच असतील सीएसआरमधून इथे चांगलं करून द्या. पण हे मैदान खुलचं राहील, लोकांसाठीच राहील. आणि ते आम्ही तसं ठेवू, असे आदित्य ठाकरे यांनी ठणकावले. तुम्हाला पैसे द्यायचे असतील तर महानगरपालिकेला द्या. खुल्या मैदानासाठी ५० कोटी रुपये तुम्ही द्या, असे आदित्य ठाकरे म्हणाले.

























































