आधी लोकसभा, नंतर तुमच्या मनातील निवडणूक

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज कर्जत येथे कार्यकर्त्यांना संबोधित करताना मोठे विधान केले. अजित पवार मुख्यमंत्री व्हावेत अशी इच्छा कार्यकर्त्यांनी वारंवार व्यक्त केली आहे. आजही अजित पवार भाषण करत असताना तशा घोषणा देण्यात आल्या. त्यावर अजित पवार यांनी कार्यकर्त्यांच्या मनातील भावना व्यक्त केल्या.

अजित पवार म्हणाले की, ’इथले तरुण वेगवेगळ्या घोषणा देत होते. पण पहिली लोकसभेची निवडणूक आहे. नंतर तुमच्या मनात जे आहे ती निवडणूक होणार आहे. लोकांच्या मनात काय आहे हे आम्ही लोपं इथे आहोत ते जाणतो’. त्यामुळे अजित पवार हे लवकरच मुख्यमंत्री होणार अशी प्रतिक्रिया कार्यकर्त्यांमध्ये उमटू लागली आहे.

शरद पवार पंतप्रधान व्हावेत ही आमची इच्छा होती पण… – प्रफुल्ल पटेल
अजित पवार यांनी मुख्यमंत्री व्हावे तसेच शरद पवार पंतप्रधान व्हावेत ही आमची इच्छा होती. नरसिंह राव यांना हटवण्यासाठी आम्ही पूर्णपणे प्रयत्न केले होते. परंतु त्यावेळी राव यांनी सीताराम केसरींना काँग्रेसचे अध्यक्ष केले. त्यानंतर एच.डी. देवेगौडा पंतप्रधान झाले. पण सीताराम केसरी यांनी देवेगौडा यांचा पाठिंबा काढून घेतला. 135 पेक्षा जास्त खासदार शरद पवार यांच्या घरी आले. तुम्ही केसरींना हटवा अशी विनंती सर्वांनी केली. त्यावेळी देवेगौडा यांचा मला पह्न आला. मी त्यांच्या घरी गेलो. तेव्हा देवेगौडा यांनी मी राजीनामा देतो, पण केसरींना हटवा असे म्हणाले. शरद पवार यांना भूमिका घ्यायला सांगा असा मला निरोप दिला’’, अशी माहिती प्रफुल्ल पटेल यांनी दिली.