विषयाची आकर्षक मांडणी

>> किरण खोत, निवेदक, सूत्रसंचालक

एखाद्या व्यक्तीसोबत किंवा समूहासोबत आपण जेव्हा संभाषण करत असतो तेव्हा आपण कोणत्या विषयावर बोलतो आहे, त्यासोबतच ते आपण कोणत्या पद्धतीने सादर करतो, कसे मांडतो, यालादेखील खूप महत्त्व असते.

एखादा मुद्दा किंवा एखादी गोष्ट आपण साध्या-सोप्या-सरळ भाषेत जर श्रोत्यांना सादर केली तर ते ऐकण्यात त्यांना तितकासा रस वाटत नाही. त्याऐवजी जर त्यात एखादी गमतीशीर गोष्ट, एखादा विनोद, समर्पक म्हणींचा वापर किंवा पुरणातील कथा अशा श्रोत्यांना माहीत नसलेल्या गोष्टींचा जर उपयोग केला तर त्या संभाषणाला रंजकता प्राप्त होते आणि मग श्रोते कान टवकारून नव्या माहितीचा आनंद घेण्यासाठी तुमचे संभाषण लक्षपूर्वक ऐकतात.

असे विनोद, म्हणी आणि संदर्भ किंवा यशोगाथा माहीत असण्यासाठी तुम्हाला पुस्तके वाचणे खूप गरजेचे आहे. ऑडिओ बुक्स, विकिपीडिया आणि गुगलच्या माध्यमातून आपल्याला हवी ती माहिती काही क्षणात आजकाल प्राप्त करता येते. आर्टिफिशल इंटेलिजन्सने तर आता सगळी गणितं सोपी करून टाकली आहेत. म्हणूनच आपण आपल्या विषयाला रंजक बनवण्यासाठी त्या विषयाला अनुरूप असणाऱया संदर्भांचा नक्कीच अभ्यास करायला हवा. हे संदर्भ मांडत असताना शक्य असल्यास पार्श्वसंगीताचा वापर केल्यावर त्याची परिणामकारकता वाम्हणजेच विनोदाच्या वेळेस लाफ्टर्स, युद्धप्रसंग मांडताना वीरश्रीप्रधान संगीत, एखादा दुःखद प्रसंग सांगणारामागे हलक्या आवाजात वाजणारे व्हायोलिन, एखादी भावपूर्ण कथा सांगणारे एखादी भावपूर्ण कथा सांगत असताना बासरी किंवा तानपुरा यांचा वापर तुमच्या मांडणीला अधिक आकर्षक बनवतो.

तुम्ही काय सांगताय यापेक्षा तुम्ही ते कसे मांडताय हे श्रोत्यांच्या दृष्टिकोनातून जास्त महत्त्वाचे असते. आवाजातील चदेहबोली याचसोबत उत्तम मांडणीचा वापर केल्यामुळे तुमचे संभाषण ऐकण्याजोगे होते. तेव्हा एखाद्या गोष्टीवर भाष्य करण्यापूर्वी यापुत्याच्याशी निगडित असणाऱया उदाहरणांचा, सुविचारांचा, विनोदांचा, म्हणींचा अभ्यास जरूर करावा. पण हेसुद्धा लक्षात घ्यावं की, मुख्य मुद्दा सोडून या गोष्टींचा वापर केल्यामुळे आपण विषय सोडून भरकटत तर जात नाही ना!

अशा पद्धतीने मुख्य विषय आणि संदर्भ यांचा सुवर्णमध्य साधत आपल्याला आपले सादरीकरण अधिक आकर्षक करून श्रोत्यांसमोर प्रभावीपणे मांडता येते. वक्ता म्हणून ऐकणाऱयाच्या ज्ञानात काही नवी भर घालण्याची संधी आपल्याला मिळवता येते.