स्वराज्याची रणरागिणी महाराणी ताराराणी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

छत्रपती राजाराम महाराज भोसले यांच्या पत्नी महाराणी ताराबाई भोसले या अत्यंत शूर, लढवय्या महाराणी. औरंगजेबास शेवटपर्यंत त्राही त्राही करून सोडणाऱ्या, मराठा साम्राज्य वाढवणाऱ्या महाराणी ताराबाईच होत्या. ‘दिल्ली झाली दीनवाणी। दिल्लीशाचे गेले पाणी। ताराबाई रामराणी। भद्रकाली कोपली। ताराबाईच्या बखते। दिल्लीपतीची तखते।।’ या शब्दात महाराणी ताराबाई यांचे वर्णन केले जाते. महाराणी ताराबाई यांनी मराठेशाही टिकविण्यासाठी केलेल्या संघर्षाकडे इतिहासाने तसे दुर्लक्षच केले आहे. मराठय़ांचे स्वराज्याचे तात्त्विक अधिष्ठान जपले पाहिजे, यासाठी त्या कायम प्रयत्नशील राहिल्या. 9 डिसेंबर 1761 रोजी अजिंक्यतारा किल्ल्यावर महाराणी ताराराणींचे निधन झाले. साताऱयापासून जवळच संगम माहुली हे गाव कृष्णा आणि वेण्णा या नद्यांच्या संगमावर वसलेले आहे. इथेच नदीपात्रात छत्रपती शाहू महाराज आणि महाराणी ताराबाई यांच्या समाधी आहेत. सध्या महाराणी ताराबाई यांच्या समाधीचे अवषेश संगम माहुली गावातील एका समाधीवर आणून ठेवले आहेत. ऐतिहासिक वारसा असलेल्या या समाधीचे जतन आणि संवर्धन करण्यासाठी पुरातत्व विभाग आणि राज्य शासनाकडून विशेष प्रयत्न सुरू आहेत. तसेच, सामाजिक संस्थांच्या माध्यमातूनही या स्थळाची देखभाल केली जात आहे.