
नीट पेपरफुटीप्रकरणी केंद्रिय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी कॉक्रोच जनता पार्टीने (सीजेपी) नवी दिल्लीतील जंतर मंतर येथे थाळी नाद आंदोलन केले. ‘गो धर्मेंद्र प्रधान गो’ असे नारे लगावून सीजेपीच्या समर्थकांनी परिसर दणाणून सोडला. आंदोलनासाठी सायंकाळी पाच वाजेपर्यंतच परवानगी होती. मात्र, सीजेपीचे संस्थापक अभिजीत दीपके यांच्यासह शेकडो आंदोलक रात्री उशिरापर्यंत जंतर मंतर परिसरातच ठिय्या मांडून होते. धर्मेंद्र प्रधान राजीनामा देत नाहीत, तोपर्यंत आंदोलन सुरूच ठेवणार, असा निर्धार सीजेपीने केला.





























































