ममतांना धक्का; तृणमूलची तीन बँक खाती गोठवली 440 कोटी अडकले!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

निवडणुकीतील पराभव आणि पक्षातील फुटीनंतर ममता बॅनर्जी यांना तिसरा धक्का बसला आहे. तृणमूल काँग्रेसची तीन बँक खाती गोठवण्यात आली आहेत. या यामध्ये 440 कोटी रुपये होते. दहा बंडखोर आमदारांनी यासंदर्भात पोलीस तक्रार केली होती. तृणमूलच्या खात्यामधील पैशाच्या स्रोताची चौकशी करण्याची मागणी केली होती. त्यानंतर पोलिसांच्या सायबर सेलने ही कारवाई केली. त्यामुळे या खात्यांमधून व्यवहार करता येणार नाही.