सत्याचा शोध- कुसंस्काराचा संस्कार

>>चंद्रसेन टिळेकर

भक्तिमार्गात सर्व ज्ञानेंद्रिये बंद करून निष्ठेने श्रद्धा ठेवावी लागते. मग ती भक्ती देवाची असो, एखाद्या तुमच्या आवडत्या संताची असो, अथवा महापुरुषांची किंवा तुम्हाला पवित्र वाटणाऱया धर्मग्रंथांची असो. तिथे तुम्हाला कसलाही प्रश्न विचारता येत नाही, शंका घेता येत नाही. अशा प्रकारची मनोधारणा मानवी विकासातील मोठा अडथळा आहे. कारण रानटी अवस्थेतील मानवाचा आताच्या आधुनिक काळातील मानवापर्यंत विकासाचा जो प्रवास झाला तो केवळ प्रश्न विचारण्यातून झाला आहे, चिकित्सेतून झाला आहे हे निर्विवाद सत्य आहे.

शालेय विद्यार्थ्यांचा अगदी पहिल्या शिबिरापासून उत्तम प्रतिसाद मिळाल्यामुळे दरवर्षी दिवाळीच्या किंवा उन्हाळय़ाच्या सुट्टीत असे शिबीर घेणे हा आमच्यासाठी एक आनंदाचा संकेत होऊन बसला. ही मुले ज्या सामाजिक स्तरातून येत होती तिथे मोठय़ा प्रमाणावर अंधश्रद्धा अत्यंत कडवटपणे अगदी निष्ठेने जोपासल्या जातात याची आम्हाला जाणीव होती. आम्ही राहतो त्या आमच्या सोसायटीपासून हाकेच्या अंतरावर एक वस्ती आहे. त्यांच्या बोलण्यात करणी केली, मूठ मारली, कुलस्वामिनीचा कोप असले काही ना काही नेहमी ऐकायला मिळत असते. त्यांच्या घरातलीच मुले-मुली सुट्टीत आमच्या शिबिरात येत असल्याने अंधश्रद्धा निर्मूलन हा विषय घेणे निकडीचेच होते. माझाही तो विषय आवडीचा असल्याने एका शिबिरात मी ‘अंगात येणे’ या विषयावर बोलत होतो. अंगात येण्याचे दोन प्रकार सांगताना एक मानसिक संतुलन बिघडल्यामुळे व दुसरे निव्वळ खोटे असते. ढोंग असते असे ठसविण्याचा प्रयत्न केला.

दीड तासाने शिबीर संपल्यावर एक मुलगी माझ्याजवळ आली आणि मला म्हणाली, “सर, ज्यांच्या अंगात येते ती माणसे ढोंगी असतात का?” “असेच काही नाही, परंतु अशा बऱयाच केसेस असतात.” “मग माझीही आई ढोंगी आहे असे म्हणावे लागेल.” मी गोंधळून म्हटले, “का गं, असे का म्हणतेस?” “कारण अमावस्या-पौर्णिमला तिच्या अंगात येते.” मी गडबडलोच. मुलगी तर्कसंगतीनेच बोलत होती. परंतु तिच्याशी सहमत होणे धोक्याचे होते. कारण त्यामुळे तिच्या मनात आपली आई ढोंगी आहे हे ठसले गेले असते. साहजिकच मला माझा पवित्रा बदलणे भाग होत. मी तिला म्हटले, “अगं काही वेळेला दुसऱयाचे पाहूनही तसे करतात. तू उगाच तुझ्या आईवर काहीतरी संशय घेऊ नकोस.” मी कशीबशी माझी सुटका करून घेतली.

अंधश्रद्धा हा विषय महत्त्वाचा खरा, परंतु तो अत्यंत नाजूकही आहे हे या उदाहरणावरून कोणालाही पटावे. कोवळय़ा वयातील मुले आपल्या आई-वडिलांचे अनुकरण कळत-नकळत करीतच असतात. अनेक कुटुंबांत आई-वडील जर धार्मिक असतील तर ते आपल्या मुलांवर धार्मिक संस्कार लादण्याचा प्रयत्न करतात. अगदी स्पष्ट सांगायचे तर नीती आणि नीतीचा उपदेश हा देव किंवा धर्मकेंद्रित असता कामा नये, तर तो मनुष्यकेंद्रित असायला हवा.

भक्तिमार्गात तुम्हाला कसलाही प्रश्न विचारता येत नाही, शंका घेता येत नाही. त्याऐवजी सर्व ज्ञानेंद्रिये बंद करून निष्ठेने श्रद्धा ठेवावी लागते. मग ती भक्ती देवाची असो, एखाद्या तुमच्या आवडत्या संताची असो, अथवा महापुरुषांची किंवा तुम्हाला पवित्र वाटणाऱया धर्मग्रंथांची असो. अशा प्रकारची मनोधारणा मानवी विकासातील मोठा अडथळा आहे. कारण रानटी अवस्थेतील मानवाचा आताच्या आधुनिक काळातील मानवापर्यंत विकासाचा जो प्रवास झाला तो केवळ प्रश्न विचारण्यातून झाला आहे, चिकित्सेतून झाला आहे हे निर्विवाद सत्य आहे आणि म्हणून मुलांनी प्रश्न विचारले पाहिजेत. त्यासाठी आपण त्यांना उद्युक्त केले पाहिजे. भक्तिमार्गात ते अजिबात शक्य नसते. म्हणून कोवळय़ा वयाच्या मुलांवर धार्मिक संस्कार करताना मोठी खबरदारी घेतली पाहिजे.

आपल्यासारख्या अविकसित देशाला प्रगत देशाच्या मांडीला मांडी लावून बसायचे असेल तर सत्याचा मार्ग अजिबात सोडता येणार नाही आणि तसा तो सोडू नये. म्हणूनच आपल्या देशाचे संविधान आपल्याला बजावते की, “वैज्ञानिक प्रवृत्ती जपणे हे प्रत्येक हिंदुस्थानींचे कर्तव्य आहे. डूग्म्त 51(A) saब्s ” घ्ऊ एप्Aथ्थ् ँं ऊप्ं अऊभ् ध्इ न्न्Rिंभ् ण्घ्ऊघ्Zऱिं ध्इ घ्ऱअ ऊध् अन्थ्धिं्झ् एण्घ्ऱिंऊघ्इघ्ण् ऊश्झ्Rिं Aऱअ झ्RएRिंन्न्ं घ्ऊ.. संस्काराच्या नावाखाली आपण कुसंस्कार तर करीत नाही ना याबद्दल सजग असले पाहिजे. शिबिरात येणाऱया ज्या मुलीच्या आईच्या अंगात येते तिचा शैक्षणिक स्तर पाहता संविधानाला हिंदुस्थानी नागरिकांकडून काय अपेक्षित आहे हे माहीत नसणार हे समजण्यासारखे आहे, परंतु शिक्षित, सुशिक्षित, सुविद्य वर्गाचे काय? ही मंडळीच नव्हे तर बहुतांशी हिंदुस्थानी जनता या बाबतीत संविधानाचे पालन करते असे म्हणणे हे धारिष्टय़ाचे ठरेल. कारण निम्म्याहून अधिक प्रजा या ना त्या दुष्ट रूढी, निष्फळ व्रत-वैकल्ये, खर्चिक कर्मकांडे आणि नाना तऱहेच्या अंधश्रद्धांत लडबडून गेली आहे. अशा गोष्टींच्या विरोधात बोलणे, प्रबोधन करणे म्हणजे धर्माच्या विरोधात बोलणे असा हेतुपुरस्सर समज हितसंबंधी लोकांनी आधीच समाजात वर्षानुवर्षे रुजवला असल्यामुळे अनेकदा असे समाजप्रबोधनाचे काम करणे म्हणजे स्वत:च्या जिवावर संकट ओढवून घेण्यासारखे असते. काही वर्षांपूर्वी महाराष्ट्रात व शेजारच्या राज्यात याचमुळे चार विचारवंतांच्या हत्या झाल्या ते आपण अजून विसरलेलो नाहीत. प्रबोधनाचे काम करणे म्हणजे प्रवाहाच्या विरुद्ध पोहण्यासारखे. त्यामुळे या कार्यात उडी घेणाऱया मंडळींचा अभाव असतो.

या उलट अलीकडे आपल्या समाजात धार्मिक जल्लोष वाढत्या प्रमाणात दिसून येतोय. याचे अनेक दुष्परिणाम आपण अनुभवत आहोत. या विषयावरही वैचारिक अभिसरण आणि त्यातून कृती होणे आवश्यक आहे.

[email protected] 

(लेखक वैज्ञानिक व वैचारिक विषयाचे अभ्यासक असून विवेकवादी चळवळीशी निगडित आहेत.)