‘मुंबई पोलीस आयुक्तांचा इतिहास’ पुस्तकाचे आज प्रकाशन

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

ज्येष्ठ पत्रकार प्रभाकर पवार लिखित ‘मुंबई पोलीस आयुक्तांचा इतिहास’ या पुस्तकाचा दिमाखदार प्रकाशन सोहळा गुरुवार, २० ऑगस्ट रोजी दुपारी ३.३० वाजता फोर्ट येथील मुंबई पोलीस क्लबच्या प्रेरणा सभागृहात पार पडणार आहे.

शिवसेना नेते-खासदार संजय राऊत, मुंबई पोलीस आयुक्त देवेन भारती, माजी पोलीस आयुक्त एम. एन. सिंग यांच्या हस्ते पुस्तकाचे प्रकाशन होणार आहे. या पुस्तकाच्या निमित्ताने मुंबई पोलीस आयुक्तांचा प्रेरणादायी कार्यकाळ उलगडणार आहे. पप्पू-प्राची प्रकाशनतर्फे हा सोहळा आयोजित करण्यात आला आहे.